औरंगाबादला कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असतांना लॉकडाऊनला देखील विरोध वाढत होता. अखेर प्रशासनाने नरमाईची भुमिका घेत औरंगाबाद येथील लॉकडाऊनचा निर्णय मागे घेतला. लॉकडाऊन मागे घेण्यात आल्याचे समजताच खासदार इम्तियाज जलील यांनी सर्व नियम गुंडाळून विजयी मिरणवूक काढली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी औरंगाबाद शहरातील लॉकडाऊनच्या निर्णयाला स्थगिती दिली. या निर्णयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी व्यापा-यांसह खा. इम्तियाज जलील आपला उत्साह लपवू वा आवरु शकले नाही. खा. इम्तीयाज जलील यांना व्यापा-यांनी खांद्यावर बसवून सोशल डिस्टन्स न पाळता मास्क न वापरता सर्व नियम तुडवत मिरवणूक काढली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.