Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाणे येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायी; चौकशीसाठी समिती नेमणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Webdunia
सोमवार, 14 ऑगस्ट 2023 (07:28 IST)
Death of patients in government hospital in Thane ठाणे (कळवा) येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायी आहे सदरची घटना शासनाने अत्यंत गांभीर्याने घेतली असून सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल. समितीचा अहवाल येईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
 
सातारा जिल्ह्यातील दरे येथे माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित होते.
 
श्री. शिंदे म्हणाले की, ठाणे येथील रुग्णालयात घडलेली रुग्णांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार यातील काही रुग्ण हे अत्यंत क्रिटिकल स्थितीत दाखल झाले होते, काही रुग्ण खाजगी रुग्णालयातूनही संदर्भित झाले होते. वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराने वेगवेगळ्या दिवशी सदरचे रुग्ण याठिकाणी दाखल झाले होते. या अत्यंत वेदनादायी घटनेबद्दल सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्याशीही बोलणे झाले असून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आरोग्य यंत्रणेच्या सातत्याने संपर्कात आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

चोरांनी तीन एटीएममधून 70 लाख रुपये लुटले, 6 जणांना अटक

सिनेट निवडणुकीचे निकाल जाहीर, शिवसेनेचा (UBT) दणदणीत विजय

परदेशांमध्ये वाढत आहे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेची मागणी

नेमबाज मनू भाकरने ट्रोलर्सवर निशाणा साधला

'सर्व काही बिल्डरांना देऊ नका', मुंबईतील हरित क्षेत्र कमी होत असल्यामुळे सुप्रीम न्यायालयाची कडक टिप्पणी

पुढील लेख
Show comments