suvichar

ठाकरे गटाच्या खासदाराला जिवे मारण्याची धमकी

Webdunia
शनिवार, 25 मार्च 2023 (21:03 IST)
Twitter
परभणी: राजकीय नेत्यांना धमकी देण्याच्या घटना सुरूच आहेत. त्यातचं आता परभणीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संजय जाधव हे परभणीचे खासदार आहेत. संजय जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या बातमीनं खळबळ उडाली आहे.
 
दरम्यान त्यांना या आगोदर देखील एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एक वर्षापूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. राजकीय नेत्यांना धमकी देण्याच्या घटना सुरूच आहेत. संजय जाधव यांच्यापूर्वी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांना देखील धमकी देण्यात आली आहे.नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून दहा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारू अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान नितीन गडकरी यांना त्यापूर्वी देखील एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दोन्ही वेळेस नितीन गडकरी यांना जयेश पुजारी या व्यक्तीच्या नावाने धमक्या आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे.

 Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: देशातील पहिले एआय आयुक्तालय महाराष्ट्रात सुरू होणार

राज्य सरकारवर ९६,४०० कोटी रुपयांची थकबाकी; कंत्राटदारांनी काम थांबवले

इस्रायलने इराणचे ८ पूल उद्ध्वस्त केले, नेतान्याहू म्हणाले, 'दहशतवादी राजवट चिरडून टाकत आहेत

दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी डेव्हिड वॉर्नरला अटक

ट्रम्प यांनी इराणसोबत शस्त्रसंधीची घोषणा केली, होर्मुझबाबत प्रमुख अटी ठेवल्या

पुढील लेख
Show comments