Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकार आल्यावर तात्काळ कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार – अजित पवार

deficit of farmers after the government comes - Ajit Pawar
Webdunia
गुरूवार, 22 ऑगस्ट 2019 (10:07 IST)
आमचं सरकार आल्यावर तात्काळ कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पुसद येथील जाहीर सभेत दिली. हे शेतकऱ्यांचे सरकार नाही तर मुठभर लोकांचे सरकार आहे. सत्तेत असून शिवसेना मोर्चा काढते लोकांना दुधखुळे समजता का? असा संतप्त सवाल पवार यांनी केला.
 
राज्य कुठल्या दिशेने चाललंय? माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक, स्व. सुधाकर नाईक, खा. शरद पवार  यांनी राज्याला दिशा दिली परंतु यांनी राज्य कंगाल करून टाकले आहे. या सरकारने पाच वर्षांत किती शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला ते जाहीर करावे, असे जाहीर आव्हान पवार यांनी सरकारला दिले.
 
मोठमोठ्या कंपन्या बंद होत आहेत. अनेक उद्योग बंद होत आहेत. कामगार बेकार होत आहेत. मात्र वाचाळवीर काहीही बोलतात. राज्यात अस्वस्थता आहे. चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चौकशी होत आहे. माजी केंद्रिय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचीही चौकशी केली जात आहे. चौकशी करा पण ज्यापद्धतीचे राजकारण केले जात आहे, ते योग्य नाही असेही पवार म्हणाले.
 
शेतकऱ्यांची कधीच कुणी अशी क्रूर थट्टा केली नाही जेवढी या भाजपा सरकारने केली आहे, असा थेट आरोप खासदार डॉ. अमोल कोल्हे  यांनी यावेळी केला. सत्ताधाऱ्यांची जनतेशी काय बांधिलकी आहे हे पूरग्रस्तांविषयीच्या त्यांच्या असंवेदनशीलतेवरून लक्षात येते असेही कोल्हे म्हणाले. पाच वर्ष कचाकचा भांडायचं आणि नंतर आमची युती झाली आहे असं सांगायचं असा उपरोधिक टोला कोल्हे यांनी शिवसेना भाजपा युती युतीबाबत लगावला. यावेळी आमदार मनोहर नाईक, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी यांनीही आपले विचार मांडले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

भारतात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगणा तालुक्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात ४ वर्षांच्या मुलीची मृत्यू

LIVE: शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले राज्यात सीबीएसई पॅटर्न २ टप्प्यात लागू करणार

पालघर मध्ये तरुणाने विषारी कार्बन मोनोऑक्साइड वायू श्वासाने घेऊन केली आत्महत्या

औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय स्मारक... वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

पुढील लेख
Show comments