Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देहूकरांना ओळखपत्र दाखवूनच गावात प्रवेश देण्यात येणार

Webdunia
सोमवार, 28 जून 2021 (16:20 IST)
आषाढी वारी सोहळा येत्या 1 जुलैला जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाने सुरू होत आहे. पण यंदा ही कोरोनामुळे हा सोहळा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थित होणार आहे. भागवतांच्या संभाव्य गर्दीमुळे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालायकडून देहू आणि आळंदीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
 
त्याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी 28 जून ते 4 जुलै पर्यंत देहू आणि आसपासच्या 6 गावांमध्ये संचारबंदी लागू केलीये. त्यात स्थानिक देहूकरांना ओळखपत्र दाखवूनच गावात प्रवेश देण्यात येणार आहे. देहूरोड पोलिसांकडून याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. बॅरिकेट्स लावून पोलिसांनी मंदिर परिसर बंद केला आहे, त्यामुळे संपूर्ण देहूनगरीला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय.
 
कोरोनाच्या वाढता प्रसार पाहता गर्दी टाळण्यासाठी जमेल तितके कठोर निर्बंध स्थानिक प्रशासनाकडून लावण्यात येत असल्याचं दिसून येतंय. सरकारने दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन केलं जावं याची स्थानिक पातळीवर देखील खबरदारी घेतली जात आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments