Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साताऱ्यातील वडूज येथील जम्बो (पोर्टेबल) कोविड सेंटरचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Webdunia
सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (16:21 IST)
नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे असून ग्रामीण भागात आरोग्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा कमी पडू देणार नाही, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल,अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.वडूज येथील जम्बो (पोर्टेबल) कोविड सेंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले.यावेळी ते बोलत होते. 
 
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, शासनाने 500 रुग्णवाहिका घेतल्या असून 30 सप्टेंबरपर्यंत आणखी 500 रुग्णवाहिका घेण्यात येणार आहेत.राज्यात कोरोना नियंत्रणाला प्राधान्य देण्यात येत असून त्यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक आहे. सर्वांनी मास्कचा वापर केल्यास आणि एकमेकांची काळजी घेतल्यास कोरोना नियंत्रणात आणणे शक्य होईल.
 
मॉड्युलर कोविड रुग्णालयामुळे उपचाराची चांगली सोय होणार असून अमेरिका इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने इथे उत्तम सुविधा देण्यात आल्या आहेत. डॉक्टर फॉर यु संस्थेचे डॉक्टर्सदेखील उपचारासाठी सहकार्य करणार आहेत. रुग्णांचा ताण कमी करून त्यांना प्रसन्न वाटावे असे वातावरण उपलब्ध करून देण्याची दक्षता घ्यावी आणि परिसरात स्वच्छता ठेवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
वडूजच्या वाढीव पाणी पुरावठा योजनेस मंजुरी देणार वडूज नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वडूज वाढीव पाणी पुरवठा योजनेस मंजुरी देण्यात येईल, त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने येत्या आठवड्यात प्रस्ताव सादर करावा, असे श्री. पवार यांनी सांगितले.ते म्हणाले,नगर पंचायतीने दर्जेदार कामे करावी.सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून आराखड्यास अंतिम रूप देऊन लवकरच काम सुरू करण्यात येईल. जिहे कटापूर योजनेचे कामदेखील लवकर सुरू करण्यात येईल असे पवार म्हणाले.
 
सातारा ही देशभक्तांची आणि वीरांची भूमी असून इथल्या नव्या पिढीने हा वारसा पुढे नेताना कला, क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातही यशस्वी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

देशमुख म्हणाले, नव्या कोविड रुग्णालयामुळे ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. या रुग्णालयासाठी उपमुख्यमंत्री पवार यांचे विशेष सहकार्य मिळाले.अमेरिका इंडिया फाउंडेशनचे मॅथ्यू जोसेफ यांनी जिल्हा प्रशासनाने चांगले रुग्णालय उभारल्याचे सांगितले. कोविड काळात आरोग्याच्या उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा फाउंडेशनचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी आणि मृत्यू दर कमी होत आहे. 608 ऑक्सिजन, 80 व्हेंटिलेटर आणि 184 आयसीयू बेडची क्षमता वाढविण्यात येत आहे. 6 नवीन मिनी जम्बो कोविड रुग्णालय, 20 पीएसए ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येत आहेत. 175 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन क्षमता वाढविण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
 
डॉक्टर फॉर यु संस्थेतर्फे देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेच्या किल्ल्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आल्या.

ग्रामीण रुग्णालय वडूज परिसरात अमेरिकन इंडिया फाउंडेशनच्या सहकार्यातून  100 बेडेड मॉड्युलर कोविडं हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून 250 एलपीएम ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. हॉस्पिटलमध्ये 8 कंटेनर असून 64 ऑक्सिजन आणि 16 आयसीयू बेड आहेत.10 व्हेंटिलेटर आणि 5 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर सयंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत.शासनाच्या माध्यमातून वैद्यकीय उपकरणे,औषधे,ऑक्सिजन आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

Palghar रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे रुग्णवाहिकेतच प्रसूती करावी लागली

वॉकआउटनंतर विरोधक सभागृहात परतले, परभणी हिंसाचार आणि सरपंच हत्येवरून गोंधळ

LIVE: टाइमपाससाठी सत्र सुरू- उद्धव ठाकरे

एल्गार प्रकरणातील आरोपी रोना विल्सनला जामीन नाही, न्यायालयाने म्हटले- त्याची गरज नाही

Year Ender 2024 : 2024 ची Hottest Car ज्याने भारतात खळबळ उडवून दिली, परवडण्यायोग्य असण्यासोबत वैशिष्ट्ये देखील दमदार

पुढील लेख
Show comments