Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Devendra Fadnavis for Maharashtra फेसबुक पेज विरोधात गुन्हा दाखल

Webdunia
मंगळवार, 26 डिसेंबर 2017 (09:37 IST)

- युवती संघटनेच्या पुणे शहराध्यक्ष मनाली भिलारे यांनी देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र च्याविरोधात दाखल केली एफआयआर

राष्ट्रवादी काँग्रेस युवती संघटनेच्या पुणे शहराध्यक्ष व सोशल मीडिया प्रमुख मनाली भिलारे यांनी पुणे येथील खडक पोलिस ठाण्यात Devendra Fadnavis for Maharashtra या फेसबुक पेजविरोधात काल एफआयआरद्वारे फिर्याद दाखल केली. देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या पेजवरून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांविषयी अत्यंत अश्लाघ्य व आक्षेपार्ह भाषेत मजकूर प्रसृत केला जात आहे व त्यामुळे या पोस्टवरील कमेंटमध्ये महिलांविषयी आक्षेपार्ह व अश्लील मजकूर लिहिला जात आहे. त्यामुळे मनाली भिलारे यांनी भारतीय दंड संहिता १८६० या अधिनियमाअंतर्गत कलम ५०९ व ५०० तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० याअंतर्गत कलम ६६(C) व कलम ६७ अन्वये कायदेशीर कारवाई व गुन्हा दाखल करण्यासाठी खडक पोलिस ठाणे, पुणे येथे फिर्याद दाखल केली असून दिनांक २२ डिसेंबर रोजी इन्स्पेक्टर राजेंद्र केशवराव मोकाशी यांनी फिर्याद स्वीकारून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पुढील तपास इन्स्पेक्टर संभाजी रामचंद्र यांच्याकडे सोपवला.

देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र असं नाव या पेजला आहे. या पेजवरचा बराचसा मजकूर शिष्टसंमत पातळी सोडून असतो. देवेंद्र फडणवीस या नावाला तर ते अजिबात साजेसं नाही. पण देवेंद्र फडणवीस   हे सध्या मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री आहेत याचाही सोयीस्कर विसर या पेज चालवणाऱ्यांना पडला आहे. त्यांनी पातळी सोडल्यामुळे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही सुसंस्कृत प्रतिमेला अनेक तडे गेले आहेत. मूळ छायाचित्रांत फेरफार करून त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिणे, पक्षाच्या चिन्हाचे विद्रुपीकरण करणे अशा गोष्टी करून पक्षाच्या नेत्यांची नाहक बदनामी या पेजवरून केली जात आहे. असा नाठाळपणा करणाऱ्यांवर लोकशाहीमार्गाने कायद्याचा बडगा उभारणेच योग्य ठरणार आहेत. तरंच अशा विकृत मानसिकतेला आळा बसेल, अशा विश्वास भिलारे यांना वाटतो.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख