Marathi Biodata Maker

या कारणामुळे उद्धव ठाकरेंनी सोडलं पद

Webdunia
रविवार, 1 मार्च 2020 (12:21 IST)
आजपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या दैनिक सामनाच्या संपादक असणार आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर सामनाचे संपादकपद ठेवण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे आता रश्मी ठाकरे या सामनाच्या संपादक असणार आहेत. आजपासून त्यांच्याकडे हे पद सुपूर्द करण्यात आलं आहे. सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे.
 
सामनाची सुरुवात झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे संपादकपदी होते. त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे सामनाचे संपादक राहिले. पण आता मुख्यमंत्री झाल्यामुळे लाभाच्या पदावरून अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे हे संपादकपद रश्मी ठाकरे यांच्याकडे देण्यात आलं आहे. आजच्या सामनामध्ये संपादक सौ रश्मी ठाकरे असा उल्लेखदेखील करण्यात आला आहे. त्यामुळे त्या सामनाचं कामकाज कसं पाहतात हे बघणं महत्त्वाचं आहे.
 
लाभाच्या पदावरून शंका उपस्थित होत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी संपादकपद सोडलं. खरंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून रश्मी ठाकरे या राजकारणात  एक्टिव्ह दिसल्या. त्यामुळे त्या राजकारणात येणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. रश्मी ठाकरेंनी महिला आघाडीचं काम पाहिलं आहे पण त्या कधीच कोणत्याही पदावर नव्हत्या. पण आता त्यांना सामनाचं संपादकपद देण्यात आलं आहे. तर कार्यकारी संपादक म्हणून शिवसेनेचे खासदार संजय राऊत काम पाहतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

T20 World Cup 2026 विजेते कप्तान सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन्मान केला

LIVE: पहिला कच्चा तेलाचा टँकर 'शेनलाँग' मुंबई बंदरावर सुरक्षितपणे पोहोचला

US Israel Iran War : संकटात इराणने मैत्रीपूर्ण भूमिका बजावली; कच्चा तेलाचा पहिला टँकर 'शेनलाँग' मुंबई बंदरावर सुरक्षितपणे पोहोचला

T20 लीगचे वेळापत्रक जाहीर

माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

पुढील लेख
Show comments