Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकनाथ शिंदे यांनी त्वरित अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा

Webdunia
सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (21:41 IST)
शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांच्या तोंडून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना एक अपशब्द उच्चारला गेला. 50 खोकेंबद्दल होणाऱ्या टीकेबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना जाहीर मुलाखतीत त्यांनी अपशब्दाचा वापर केला. सत्तार यांच्या या शब्दामुळे राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राज्यभरात ‘जोडे मारो’ आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी देखील तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. या दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर संताप व्यक्त करत सत्तारांवर टीका केली.
 
जयंत पाटील संतापले...
मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ह आहे. महिला लोकप्रतिनिधी विषयी गलिच्छ भाषेत बोलून सत्तार यांनी त्यांच्या मागास मनोवृत्तीचे दर्शन घडवले आहे. सत्तार यांनी यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त वक्तव्ये केलेली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी जयंत पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून केली.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

रणवीर अलाहाबादियाच्या टिप्पणीवर धीरेंद्र शास्त्री संतापले, म्हणाले-

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, स्टार खेळाडू संपूर्ण हंगामासाठी बाहेर

टेबल टेनिसमध्ये जी साथियानचा दारुण पराभव

ट्रम्प रशिया आणि चीनसोबत पुन्हा अणु नियंत्रण चर्चा सुरू करतील

LIVE: नागपुरात व्हेरिअबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर बांधणार

पुढील लेख
Show comments