Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपा प्रदेश 'बेटी बचाओ बेटी पढाओ' प्रकोष्ठ तर्फे वक्तृत्व स्पर्धा

Eloquence competition on behalf of BJP Pradesh  Beti Bachao Beti Padao  cell
Webdunia
सोमवार, 24 जानेवारी 2022 (21:02 IST)
भाजपा प्रदेश बेटी बचाओ बेटी पढाओ प्रकोष्ठ वतीने आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांच्या उपस्थितीत सोमवारी झाले. प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, बेटी बचाओ बेटी पढाओ प्रकोष्ठच्या संयोजक डॉ. शुभा पाध्ये, सहसंयोजक विनय त्रिपाठी या प्रसंगी उपस्थित होते.
 
डॉ. पाध्ये यांनी सांगितले की, वक्तृत्व स्पर्धेचा उद्देश युवा वर्गात 'बेटी बचाओ बेटी पढाओ' अभियानाविषयी जागृती निर्माण करणे हा आहे. या स्पर्धेच्या निमीत्ताने अनेक उत्तम वक्तृत्व असणाऱ्या व समाजापुढील प्रश्नांवर विचारमंथन करण्यास इच्छूक असणाऱ्या युवक युवतींना आपले विचार निर्भीडपणे मांडण्यासाठी खुले व्यासपीठ उपलब्ध होईल. आजची पिढी, तंत्रस्नेही पिढी, मुलींचे विवाहाचे वय २१ करण्याचा निर्णय, सृजनकर्ती मी, असुरक्षित मी, भारतीय स्त्री - आत्मनिर्भर स्त्री, मुलगी देशाची शान, प्रत्येक घराचा सन्मान असे वक्तृत्व स्पर्धेचे विषय आहेत. स्पर्धा १६ ते २५ ह्या वयोगटातील मुला - मुलींसाठी आहे. व्हिडीओ रेकॉर्डिंग ५० ते ६० एमबी या पेक्षा अधिक आकाराचे नसावे. प्रथम क्रमांकासाठी २१ हजार, दुसऱ्या क्रमांकासाठी ११ हजार, तिसऱ्या क्रमांकासाठी ७ हजार त्याखेरीज उत्तेजनार्थ पारितोषिकेही दिली जाणार आहेत. स्पर्धकांनी आपले व्हिडीओ competition.bbbp@gmail.com या ई-मेल वर पाठवावेत.
 
या संदर्भात अधिक माहितीसाठी अतुल प्रजापती- ९८३३२९६६२२, श्रीरंग पटवर्धन- ८८७९८३४४८७ यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहितीही डॉ.पाध्ये यांनी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदी थायलंड आणि श्रीलंकेला भेट देणार, बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होणार

CSK vs RCB Playing 11: आरसीबी सीएसकेला पराभूत करण्याचा प्रयत्न करेल, प्लेइंग 11 जाणून घ्या

LIVE: 'महाराष्ट्र विधान परिषदेत विनोदी कलाकार कामरा यांच्याविरुद्ध विशेषाधिकार उल्लंघनाची नोटीस

महाराष्ट्र विधान परिषदेने कामरा विरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस स्वीकारली

नागपुरात छेडछाडीला निषेध करणाऱ्या वडिलांची हत्या, तिघांना अटक

पुढील लेख
Show comments