rashifal-2026

लाचखोरी प्रकरणातील न्यायालयातून चिखलीकरची फाईल गायब

Webdunia
गुरूवार, 12 जुलै 2018 (16:15 IST)
महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या लाचखोर सतीश चिखलीकर प्रकरणात मोठा प्रकार उघड झाला आहे. या लाचप्रकरणातील खटल्याची मूळ तक्रार फाईलच जिल्हा सत्र न्यायालयातून संशयास्पदरित्या हरवली आहे. तर या फाईलच्या जागी न कोणत्याही साक्षीदार, तक्रारदाराची सही नसलेली बनावट तक्रार कागदपात्रांमध्ये दाखल झाली आहे. त्यातील काही मजकूरही बदलल्याचं समोर आले असून मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे.
 
नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते, त्यावेळी 2 मे 2013 रोजी एका तक्रारदाराकडून 22 हजारांची लाच स्वीकरतांना लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहाथ अटक केली होती.
 
चिखलीकरकडे दागिने आणि रोकड अशी सुमारे 17 कोटींची मालमत्ता मिळाली होती. तसेच राज्यभरात त्याची जवळपास 78 ठिकाणी मालमत्ता आढळून आली होती. त्यामुळे या प्रकरणाला मोठे महत्व प्राप्त झाले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

हिंदी महासागरात एक जोरदार भूकंप झाला; रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.३ होती

LIVE: बेकायदेशीर बांगलादेशीवर कारवाई करण्यासाठी फडणवीस सरकारने निर्णय घेतला

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये एक नवीन वळण; उमेदवारांच्या मृत्यूमुळे तीन भागातील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

बेकायदेशीर बांगलादेशींची घुसखोरी ही एक गंभीर समस्या बनली; फडणवीस सरकारने कारवाईचा मोठा निर्णय घेतला

महिला T20लीगचे वेळापत्रक जाहिर

पुढील लेख
Show comments