Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धुळे जिल्ह्यात लंपी आजाराचा शिरकाव, अडीच महिन्यात 'इतक्या' जनावरांना लागण, तर 35 जनावरांचा मृत्यू

lumpy virus
, मंगळवार, 10 ऑक्टोबर 2023 (08:14 IST)
Entry of lumpy disease धुळे जिल्ह्यात लम्पीने धुमाकूळ घातला असून तब्बल 52 गावामध्ये लम्पीचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळत असून त्यामुळे पशुपालक चिंतेत आहे. यावर पशुसंवर्धन विभागाकडून ठिकठिकाणी जनावरांचे लसीकरण करण्यात येत असून आवश्यक ती जनजागृती पशुपालकांमध्ये करण्यात येत आहे.  लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून सातत्याने लसीकरण, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. मात्र अजूनही काही जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव सुरूच आहे.
 
धुळे जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी लम्पी संसर्गजन्य आजाराने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील चारही तालुक्यात तब्बल 52 गावांमध्ये लंपी आजाराचा शिरकाव झाला आहे. गेल्या अडीच महिन्यात जिल्ह्यात 35 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच तब्बल 1 हजार 353 जनावरांना याची लागण झाली असून 896 जनावरे लम्पिच्या विळख्यातून बरे झाले आहेत.
 
गोवंशात आढळणाऱ्या लम्पी या आजाराने मागील वर्षी धुमाकूळ घातला होता. त्यानंतर लसीकरणाची प्रक्रिया वेगाने राबविण्यात आल्यानंतर ही साथ नियंत्रणात आली होती. मात्र यावर्षी पुन्हा लंपीने डोके वर काढले असून धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यात तब्बल 52 गावांमध्ये लम्पीचा शिरकाव झाला असून आत्तापर्यंत 35 जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर 1 हजार 353 जनावरांना याची लागण झाली आहे, जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोवंश जनावरांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी आठवडे बाजार देखील बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, जिल्ह्यातील काही तालुक्यातील आठवडे बाजारात गोवंशय जनावरे विक्रीसाठी आणण्यात येत असून त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
 
गेल्या वर्षी नियंत्रणात असलेल्या लम्पी या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. या वर्षी सद्यस्थितीत लम्पी आजाराचा प्रादुर्भाव जिल्ह्यात आहे. त्यामुळे बाधित जनावरांपासून संसर्ग होवून चांगली, सुदृढ जनावरांना बाधा होऊ नये किंवा एकत्रित सार्वजनिक ठिकणी आणू नयेत. बाधित जनावरांचे विलगीकरण करावे.  असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी केले आहे. मात्र लम्पी या आजाराने पशुधन दगावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरद पवार घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवतात; अजित पवार गटाचा युक्तीवाद