Festival Posters

नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष निर्यात घटली

Webdunia
मंगळवार, 4 एप्रिल 2023 (21:28 IST)
जगातील २५ ते ३० देशांमध्ये महाराष्ट्रातील द्राक्ष निर्यात होत असतात. यंदाही द्राक्ष निर्यात होत आहे. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा निम्म्याहून अधिक निर्यात ही घटली. २०२१-२२ मध्ये मार्चअखेरपर्यंत १ लाख ५ हजार ८२७ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. यंदा ती अवघी ४१ हजार १०८ मेट्रिक टन झाली. देशांतर्गत द्राक्षांना मागणी वाढली हीच फक्त द्राक्ष उत्पादकासाठी जमेची बाजू आहे.
 
नाशिक जिल्ह्यातील द्राक्षे युरोप, आखाती देशासह श्रीलंका, नेपाळ, बांगलादेशात मोठ्या प्रमाणात निर्यात होतात. परंतु, यंदा द्राक्ष काढणीच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच द्राक्षांवर नैसर्गिक संकटे आली. यात सुरुवातीला थंडी असल्याने द्राक्षांमध्ये साखर उतरण्यास अडचण निर्माण झाली. त्यानंतर अवकाळी पावसाने द्राक्षांचे नुकसान झाले. परदेशातही द्राक्षांतील गोडवा (१७ ते १८ ब्रीक्स साखर) हवा अशी मागणी होऊ लागल्याने अनेक द्राक्ष उत्पादकांचे नमुने बाद ठरवण्यात आले. त्याचाही फटका निर्यातीवर झाला आहे.
 
नेदरलँडला सर्वाधिक मागणी आहे. याशिवाय इंग्लंड, जर्मनी, लॅटविया, लुथियाना, डेन्मार्क, स्वीडन, आयर्लंड, पोलंड, पोर्तुगाल, बेल्जिअम, स्वित्झर्लंड, रोमानिया, आॅस्ट्रिया, फिनलंड, स्पेन, इटली, ग्रीस या देशांमध्ये द्राक्षे निर्यात केली. युरोपातील नेदरलँड या देशात सर्वाधिक म्हणजे ३० हजार ५८७ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली. त्याखालोखाल इंग्लड, जर्मनी या देशामध्ये द्राक्षांना मागणी आहे. महाराष्ट्र मोठा पुरवठादार आहे.
 
सध्या निर्यातक्षम द्राक्षांना प्रतिकिलो ६० ते ७० रुपये, तर देशांतर्गतसाठी २३ ते २७ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. परंतु, स्थानिक पातळीवरच द्राक्षांची मागणी वाढल्याने दर स्थिर राहिले आहे. आता पुन्हा उन्हाची तीव्रता वाढणार असल्याने द्राक्षामध्ये गोडवा अधिक वाढत अाहे. गोड द्राक्षांना स्थानिक ग्राहक पसंती देत असल्याने मागणी वाढणार आहे. त्यामुळे द्राक्षांचे दरदेखील वाढण्याची शक्यता आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

ऐतिहासिक आणि आध्यात्मिक संगम: सोमनाथच्या पुरातत्वीय अवशेषांमधून कोरलेली दिव्य शिवलिंगे महाकाल मंदिरात पोहोचली

जुन्नर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्याने आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

बोगस मतदार दिसले तर मनसे स्टाईल ने कारवाई करण्याचा संदीप देशपांडे यांचा इशारा

LIVE: पुण्यात लॉजिस्टिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक, भव्य लॉजिस्टिक पार्क उभारणार

जगातील पहिले राष्ट्रीय कांदा भवन महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात बांधले जाणार

पुढील लेख
Show comments