rashifal-2026

मागच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे होत नव्हतं- फडणवीस

Webdunia
गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022 (14:38 IST)
दोन्ही नेत्यांनी केलेल्या भाषणांवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर मीडियाशी बोलताना खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच, खरी शिवसेना कोणती, हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिल्याचंही ते म्हणाले.
 
“ज्या प्रमाणात लोक बीकेसीच्या मैदानावर पाहायला मिळाले ते पाहाता काल एकनाथ शिंदेंनी हे दाखवून दिलं की खरी शिवसेना कोणती. त्या मैदानाची क्षमता शिवाजी पार्कपेक्षा दुप्पट आहे. पण तरीही तिथे तुडुंब गर्दी होती. महाराष्ट्रभरातून लोक आले होते. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, हे कालच्या मेळाव्यात प्रस्थापित केलं आहे. यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो”, असं फडणवीस म्हणाले.
 
“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना…”
एकनाथ शिंदेंनी विकासाच्या मुद्द्यांना हात घातला असं म्हणत फडणवीसांनी यावेळी उद्धव ठाकरेंच्या आधीच्या भाषणांची तुलना केली आहे. “आम्ही काय करतोय, काय करणार आहे हे एकनाथ शिंदेंनी भाषणात सांगितलं. मागच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे होत नव्हतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते पक्षप्रमुखाचंच भाषण करायचे. त्यांनी एकही भाषण मुख्यमंत्र्याचं केलं नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

इलेक्ट्रिक वाहनांकडून टोल वसुली 'बेकायदेशीर' आहे, सभापती राहुल नार्वेकर यांनी दिला ८ दिवसांचा अल्टिमेटम

LIVE: सभापती राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांची मागणी फेटाळली

गोवा क्लब आगीच्या घटनेत मोठी कारवाई: लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित

भारतीय बॅडमिंटन खेळाडूंची प्रभावी कामगिरी; हुडा, तन्वी आणि किरण यांचा प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश

ज्युनियर हॉकी विश्वचषकात भारताने इतिहास रचला, अर्जेंटिनाचा ४-२ असा पराभव केला

पुढील लेख
Show comments