Dharma Sangrah

फडणवीस यांच्यावर खटला चालणार

Webdunia
मंगळवार, 3 मार्च 2020 (16:20 IST)
साल २०१४ सालच्या प्रतिज्ञा पत्रात गुन्हे लपविण्याचे प्रकरणी सुप्रीम कोर्टाने देवेंद्र फडणवीस यांना धक्का दिला आहे. शपथ पत्रात दोन गुन्हे लपवल्याप्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खटला चालणार आहे. याला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. याआधी त्यांनी स्वतः या प्रकरणात जामीन मिळावा, म्हणून नागपूरच्या कोर्टात हजेरी लावली होती.
 
१८ फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाने हा आदेश सुरक्षित ठेवला होता. आता तो न्यायालयाने दिला आहे. २०१४ सालच्या निवडणुकीदरम्यान माहिती लपविण्याचा गुन्हा केला होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांची पुनर्विचार याचिका प्रलंबित होती. परंतु, त्यावर पुर्नविचार करणे गरजेचे नाही, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. फडणवीस यांची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांना कोर्टात हजर राहून खरच त्यांनी प्रतिज्ञापत्रातील माहिती लपविली होती का? याचा खुलासा द्यावा लागणार आहे. यात ते दोषी ठरले तर सहा महिन्याची कैद किंवा दंड यापैकी कोणतीही शिक्षा होऊ शकते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

LIVE: नामांकनाच्या शेवटच्या दिवशी भाजप शिवसेनेतील युती14 ठिकाणी तुटली

नामांकनाच्या शेवटच्या दिवशी भाजप शिवसेनेतील युती14 ठिकाणी तुटली

जपानला मागे टाकत भारत ठरला जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था

इंदूरमध्ये घाणेरड्या पाण्यामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे, 1,100 जण आजारी

IND W vs SL W : भारताने वर्षाचा शेवट श्रीलंकेला पराभूत करत विजयाने केला

पुढील लेख
Show comments