Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणताब्यांतील कोअर कमिटीत मतभेद, नाशिकमध्ये संप सुरूच

Webdunia
शनिवार, 3 जून 2017 (11:27 IST)

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शेतकरी संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली असली तरी पुणताब्यांतील कोअर कमिटीच्या शेतकऱ्यांमधील मतभेद आहेत.  मुख्यमंत्र्यांनी 100 टक्के मागण्या मान्य न केल्यानं  पुणतांब्यात शेतकऱ्यांनी कोअर कमिटीच्या विरोधात निदर्शनं केली.  

यापूर्वी जे शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटले होते, त्या शेतकऱ्यांनी,  मुख्यमंत्रांना भेटायला गेलेल्या शेतकऱ्यांविरोधा निदर्शने केली. तसंच आम्ही संपावर ठाम असल्याचं काही गावकऱ्यांनी नमूद केलं. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला यापेक्षा अधिक मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्यापेक्षा कमीच मागण्या मान्य झाल्या, असं म्हणत पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्याच गावातील कोअर कमिटी सदस्यांचा निषेध केला.

मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दोन महिन्यांचा अवधी दिला होता, मात्र ही कोअर कमिटी कोणताही ठोस निर्णय न घेता मागे आली. तसंच ग्रामसभा घेऊन संप मागे घ्यायचा की नाही हे ठरलं होतं, मात्र त्यांनी तिकडेच संप मागे घेत असल्याचं जाहीर केल्याने, आम्ही त्यांचा निषेध करतो, असं गावकरी म्हणाले. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या कोअर कमिटीनं संप मागे घेतलेला नाही.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments