Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जन्मदात्या बापानेच दोन मुलांना विहिरीत फेकले

Webdunia
शनिवार, 29 एप्रिल 2023 (14:07 IST)
दारूच्या नशेत निर्दयी बापाने आपल्या दोन मुलांना विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील चिकल ठाण्यातील चौधरी कॉलनीमध्ये हा प्रकार शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. यात एका मुलाला वाचवण्यात यश आलं मात्र एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
 
माहितीनुसार राजू प्रकाश भोसले (वय 33 वर्षे) बापाने श्रेयस राजू भोसले (वय 7 वर्षे) आणि शिवम राजू भोसले (वय 9 वर्षे) या दोघा मुलांना विहिरीत फेकून दिलं. यात श्रेयसचा बुडून मृत्यू झाला तर शिवमला स्थानिकांनी बचावले आहे.
 
राजू भोसले आई, वडील व दोन मुलांसह राहून वेल्डींगची कामे करतो. मात्र राजूला दारूचे व्यसन लागल्यामुळे पत्नीसोबत वाद होऊ लागले. या प्रकारामुळे कंटाळून पत्नी दोन महिन्यांपूर्वी माहेरी निघून गेली मात्र दोन्ही मुलं राजूजवळ होती. 
 
शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास राजू दारूच्या नशेत दोन्ही मुलांला घरापासून 200 मीटरवर असलेल्या एका विहिरीकडे घेऊन गेला आणि त्यांना विहिरीत फेकून घरी परत आला. या घटनेत सात वर्षीय श्रेयस राजू भोसले याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर शिवम राजू भोसले याला वाचविण्यात यश आलं. पोलिस प्रकरणाचा अजून तपास घेत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुलामुळे एकनाथ शिंदे भाजपपुढे झुकले? सत्य काय आहे ते जाणून घ्या

LIVE: शिवसेना यूबीटी नेत्यांनी दिला उद्धव ठाकरेंना एमव्हीएशी संबंध तोडण्याचा सल्ला

महाराष्ट्रात फडणवीसांचा शपथविधी होईल की भाजप त्यांना चकित करेल, यावर अमित शहा करणार विचारमंथन

उद्धव ठाकरे MVA चा निरोप घेणार का? महाराष्ट्रात पराभवानंतर विरोधकांच्या गटात खळबळ!

मुंबईत एका वृद्धाची झाली एक कोटींची फसवणूक

पुढील लेख
Show comments