Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इगतपुरी-कसारा टनल प्रस्तावाच्या सर्वेक्षणाला अंतिम मंजूरी

Webdunia
बुधवार, 13 जुलै 2022 (22:03 IST)
नाशिक – मुंबई –  नाशिक या दरम्यानचा प्रवास जलद गतीने व्हावा यासाठी खा.गोडसे यांच्याकडून सातत्याने सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. मुंबई ते नाशिक या दरम्यानच्या प्रवासासाठी प्रवाशांना अडचनीचा ठरणारा इगतपुरी – कसारा या दरम्यानच्या लोहमार्गावर १ : १०० ग्रेडीयंट क्षमतेचा टनल व्हावा यासाठीच्या प्रस्तावास रेल्वे बोर्डाने जागा सर्वेक्षणाला अंतिम मान्यता दिली असून याकामी ६४ लाखांचा निधी मंजूर केला आहे.इगतपूरी – कसारा हे अंतर १६ कि.मी. चे असून या दरम्यान १ : १०० ग्रेडीयंटचा टनल झाल्यास प्रवाशांचा वेळ आणि बॅकरवर होणारा खर्च ही वाचाणार असल्याची माहीती खा. हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मध्यरेल्वे मार्गावरून ये- जा करणा-या रेल्वे गाडयांची आणि प्रवाशांची संख्या मोठी आहे. या सर्व रेल्वेगाडयांना इगतपुरी ते कसारा या दरम्यानच्या लोहमार्गावरूनच धावावे लागते.इगतपुरी ते कसारा हे १६ कि.मी. चे अंतर असून या दरम्यानच्या घाट परिसरांत पूर्वीपासून असलेले टनल हे कमी व्यासाचे आहेत. यामुळे रेल्वे गाडयांना वाढीव इंजिन, बॅकर्स लावण्याची गरज असते. परिणामी इगतपूरी – कसारा या दरम्यानच्या घाट परिसरात सतत रेल्वेगाडया थांबवाव्या लागत असल्याने प्रवासास विलंब होतो. याबरोबरच बँकरवर मोठा खर्चही होतो.

यावर उपाय म्हणून कसारा ते इगतपुरी या दरम्यान १.३७ एवजी १.१०० गेंडीयंट क्षमतेचा मध्ये टनल व्हावा अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून खा. गोडसे केंद्राकडे करत होते . खासदार गोडसे यांनी वेळोवेळी रेल्वेबोर्डच्या अधिका-यांकडे सततचा पाठपुरावा केला होता. खा. गोडसे यांची मागणी न्यायीक असल्याने कसारा – इगतपूरी या दरम्यानच्या ग्रेडीयंट टनलच्या सर्वेक्षणाच्या प्रस्तावास तात्पुरती मान्यता दिली होती.
कसारा – इगतपूरी या दरम्यानच्या ग्रेडीयंट टनलच्या सर्वेक्षणाला अंतिम मान्याता देवून याकामी निधी उपलब्ध करून देण्यासाठी काही महीन्यांनपासून खा.गोडसे केंद्राकडे सातत्याने प्रयत्नशिल होते. खा. गोडसे यांची तळमळ आणि सततचा पाठपुरावा पाहून आज रेल्वेबोर्डाने इगतपुरी – कसारा या दरम्यानच्या लोहमार्गावर १ : १०० ग्रेंडीयंट क्षमतेचा टनल प्रस्तावाच्या सर्वेक्षणाला अखेर आज अंतिम मान्यता दिली असून यासाठी ६४ लाखांच्या निधीला मंजुरी दिली आहे. रेल्वेबोर्डाच्या या निर्णयामुळे लवकरच टनल प्रस्ताव सर्वेक्षणाचे काम पूर्ण होणार असून घाट परिसरात अधिक व्यासाच्या टनलची निर्मीती होणार आहे.

यामुळे मुंबई – नाशिक दरम्यान धावणा -या रेल्वेगाडयांना घाट परिसरांत सतत थांबावे लागणार नसून गाडयांना बॅकरही लावण्याची गरज पडणार नाही.परिणामी प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे. टनल उभारणी झाल्यावर मुंबईहून कसा-यापर्यंत धावणारी लोकल नाशिक पर्यत धावणे शक्य होणार असून या प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार कोटी रूपये खर्च येणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.याबरोबरच इगतपुरी – कसारा या दरम्यान चौथी व पाचवी रेल्वे लाईन वाढविण्याचा प्रस्ताव रेल्वेप्रशानाच्या विचाराधीन आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

कुणाल कामराच्या ' वक्तव्याला 'सुव्यवस्थित कट' असल्याचा एकनाथ शिंदेंचा आरोप

RR vs KKR: सहावा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात

एकनाथ शिंदे यांच्यावरील वक्तव्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची कुणाल कामरावर घणाघात टीका

कुणाल कामरा यांचा माफी न मागण्याचा निर्णय योग्य काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांचे विधान

LIVE: नागपूर हिंसाचार प्रकरणी 114 हून अधिक आरोपींना ताब्यात घेतले

पुढील लेख
Show comments