Marathi Biodata Maker

एसटी बसचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे निधन

Webdunia
First ST Conductor Laxman Kevate Death महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग मंडळाची पहिली एसटी बसचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९९ वर्षांचे होते. बुधवारी रात्री साडे नऊच्या वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरुन लक्ष्मण केवटे यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच एसटी महामंडळाकडून देखील आदरांजली वाहण्यात आली.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदरांजली वाहिली
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पहिले एसटी वाहक लक्ष्मण शंकर केवटे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःख देणारी आहे. १९४८ साली महाराष्ट्रात सुरु झालेल्या एसटीचे पहिले वाहक म्हणून सेवा बजावणारे लक्ष्मण केवटे यांनी एसटी महामंडळाच्या सेवेत मोलाचे कार्य केले आहे. त्यांची अलौकिक सेवा सर्व एसटी कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. महाराष्ट्रात प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाची असणाऱ्या एसटी सेवेने असंख्य प्रवाशांना आपलेसे केले आहे. या एसटीच्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्या लक्ष्मण केवटेंचा जीवनप्रवास जरी थांबला असला तरी एसटीच्या इतिहासात त्त्यांच्या कार्याची दखल कायमस्वरूपी घेतली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
 
 
लक्ष्मण केवटे हे नगर ते पुणे या बसचे पहिले वाहक होते. महामंडळात त्यांची भरती झाली तेव्हा त्यांना ८० रुपये पगार मिळत होता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

राजा राममोहनराय जयंती 2026 : आधुनिक भारताचे जनक "राजा राम मोहन रॉय''

राज्य सरकारने ५० नवीन भू-अभिलेख कार्यालये आणि १०,६८३ पदांना मंजुरी दिली

नाना पटोले यांनी ईव्हीएम आणि बनावट मतदारच्या मुद्द्यांवरून पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला

LIVE: एल निनोच्या धोक्यामुळे राज्य सरकार सतर्क

US-Iran War: जगभरातील इंटरनेट बंद करण्याची इराणच्या खासदाराची धमकी

पुढील लेख
Show comments