Marathi Biodata Maker

माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे निधन

Webdunia
सोमवार, 12 फेब्रुवारी 2024 (11:25 IST)
जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वल्लभशेठ दत्तात्रय बेनके  यांचे दिर्घ (Junnar) आजाराने काल रात्री वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले.त्यांच्यावर सोमवारी सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

बेनके हे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. बेनके यांनी जुन्नर विधानसभा मतदार संघातून सहावेळा निवडणूक लढवली होती. त्यात ते चार वेळा विजयी झाले. ते प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळे 2014 पासून सक्रिय राजकारणापासून दूर होते.

दीर्घ आजारामुळे त्यांचे अवयव देखील निकामी झाले होते. आज चाकणच्या खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पुत्र आमदार अतुल, डॉ. अमोल, अमित, दोन भाऊ, तीन बहिणी, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने जुन्नर तालुक्यात शोककळा पसरली आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

यवतमाळ: कत्तलीसाठी तेलंगणात नेण्यात येत असलेल्या जनावरांची सुटका; तीन तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल

इंधन वाचवण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अमृता फडणवीस यांनी सायकल चालवण्याचा अवलंब केला

LIVE: विदर्भातील ६ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, ९ जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा

Veer Savarkar Jayanti 2026 Messages in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Veer Savarkar Jayanti 2026 Speech in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती भाषण मराठी

पुढील लेख
Show comments