Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वडाळा-पाथर्डी रोडवरील चार कॉफी शॉप्स उद्ध्वस्त, अंधाऱ्या खोल्यांत कापडी कंपार्टमेंट बनवून लावले होते पडदे

Webdunia
बुधवार, 18 ऑक्टोबर 2023 (21:01 IST)
नाशिक  कुठलाही परवाना नसताना कॉफी शॉपचा बोर्ड लावून मुलामुलींना अश्लील कृत्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या चार कॉफी शॉप्सचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत पोलीस शिपाई मुश्रीफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की आरोपी अमोल लहू पिंगळे (वय 30, रा. उत्तमनगर, सिडको), अनिकेत सोमनाथ अहिरे (वय 21, रा. पंडितनगर, सिडको), विवेक प्रवीण सोनजे (वय 22, रा. साहिल अपार्टमेंट, उंटवाडी, नाशिक) व दिनेश प्रभाकर जावरे (वय 28, रा. आशीर्वाद अपार्टमेंट, उत्तमनगर) यांनी
 
ब्लॅकस्पून कॅफे (बापू बंगला), टोकियो कॅफे, ब्लॅकस्पून कॅफे व दक्ष इम्पिरिया यांनी वडाळा-पाथर्डी रोडवरील सराफनगर येथे कॉफी शॉप सुरू केले; मात्र कुठलाही परवाना नसताना चारही आरोपींनी कॉफी शॉपचा बोर्ड लावून आतमध्ये अंधाऱ्या खोल्यांत कापडी कंपार्टमेंट बनवून पडदे लावले व त्यात मुलामुलींना बसण्यासाठी व अश्लील कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याची तक्रार इंदिरानगर पोलिसांकडे दाखल होताच पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन चारही विनापरवाना कॉफी शॉप्सवर छापा टाकून कारवाई केली.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ekadashi 2025 Wishes in Marathi एकादशीच्या शुभेच्छा मराठीत

Vasant Panchami 2025: वसंत पंचमीला एक अद्भुत योगायोग घडत आहे, ३ राशींना मिळणार अपार लाभ !

४ फेब्रुवारीपासून ३ राशींचे भाग्य चमकेल, गुरु चालणार सरळ

चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी हिवाळ्यातील 10 घरगुती उपाय जाणून घ्या

वर्तमानपत्रात गुंडाळलेली फळे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

जळगावात भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिली, तरुणाचा मृत्यू

LIVE: नाशिक-जयपूर विमानसेवा पुन्हा सुरू होणार

नाशिक-जयपूर विमानसेवा पुन्हा सुरू होणार, वेळ आणि भाड़े जाणून घ्या

बांगलादेशींना हद्दपार करण्यासाठी एसआईटीची स्थापना

भारतीय संघ विजयी मोहीम सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी उतरणार

पुढील लेख