Dharma Sangrah

विदर्भ, मराठवाड्यात गारपीट, तिघांचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018 (09:00 IST)
विदर्भ, मराठवाड्यात झालेल्या गारपीटीत तीन जणांचा जीव गेला आहे. यात   जालना तालुक्यातील वंजार उमरद गावात गारा अंगावर पडल्यामुळे नामदेव शिंदे(७०) या वृद्धाचा मृत्यू झाला. नामदेव शिंदे शेतात जात असताना त्यांना गारांचा मार बसला. तर जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा गावात आसाराम जगताप (६५) यांचाही गारांचा मार लागून मृत्यू झाला. शौचाला जात असताना गारांच्या तडाख्यात त्यांचा मृत्यू झाला. वाशिम जिल्ह्यातील महागाव गावातील यमुनाबाई हूंबाड (८०) यांनाही गारांच्या तडाख्यात आपला जीव गमवावा लागला.  
 
विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना तुफान गारपिटीचा तडाखा बसला. जालना, वाशिम, बीड, बुलडाणा, अकोला या जिल्ह्यात गारपिटीनं अक्षरक्षः थैमान घातलं. काही वेळ ही गारपीट झाली असली तरी अनेक ठिकाणी लिंबाच्या आकाराइतक्या गारा कोसळल्या. गहू आणि हरभरासारखी पिकं काढणीवर आलेली असताना झालेल्या या गारपिटीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

ट्यूशन शिक्षिकाने प्रियकारासोबत अल्पवयीन विद्यार्थ्याची निर्घृण हत्या केली, दोषींना जन्मठेपेची शिक्षा

LIVE: मालेगाव न्यायालयाने संजय राऊत यांना दंड ठोठावला

अमेरिकेतील फेडरल एजंट्सनी एका ५ वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतल्याने खळबळ, कमला हॅरिसची प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदी आज दक्षिण भारतासाठी चार नवीन गाड्यांचे उद्घाटन करणार, तामिळनाडूमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजणार

इंडिगो विमान पुण्यात उतरत असताना धमकीची चिठ्ठी सापडली; प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले

पुढील लेख
Show comments