rashifal-2026

देवदर्शनाला निघत आहात, आधी वाचा, शिर्डी आणि पंढरपूरला दर्शनासाठी घेण्यात आलेले नियम

Webdunia
मंगळवार, 12 जानेवारी 2021 (22:30 IST)
शिर्डी आणि पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय संस्थानांनी घेतला आहे. यात  साईबाबांच दर्शन घेण्यासाठी ऑनलाईन पास असणं अत्यंत गरजेचं आहे. तर पंढरपूर विठ्ठल मंदिरात ऑनलाईन बुकींग पास सक्ती नाही. 
 
शिर्डीत गुरुवार,शनिवार आणि रविवारी दिवस फक्त ऑनलाईन पास धारकांना दर्शन देण्यात आले येणार आहे. . तसेच दर्शनासाठी ऑनलाईन पास आवश्यक आहे. भाविकांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी संस्थानने हा निर्णय घेण्यात आला आगे. गर्दी नियंत्रणासाठी ३ दिवस पास वितरण केंद्र बंद ठेवणार आहे.  शिर्डीत गुरुवारी, शनिवारी, रविवारी तसंच सुट्ट्या आणि सणांच्या दिवशी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे या दिवशी केवळ ऑनलाईन पासेस असलेल्यांनाच साईदर्शन दिलं जाणार आहे. 
 
तर  पंढरपूर विठ्ठल मंदिरात ऑनलाईन बुकींग पासकरता सक्ती नाही. २० जानेवारीपासून ओळखपत्र दाखवून दर्शन मिळणार आहे. त्यामुळे आता दर दिवशी ८००० भाविकांना मुखदर्शन मिळणार आहे. 
 
महत्वाचं म्हणजे मकर संक्रांतीला महिलांना ओवसायला बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या दिवशी दर्शन सुरूच राहणार आहे. कोरोना नियमानुसार दहा वर्षाखालील आणि ६५ वर्षावरील भाविकांना प्रवेश नाही, अशी माहिती मंदिर समिती सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदींना इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान प्रदान

ठाकरे कुटुंबाने एकत्र येऊन BMC निवडणूक लढवण्याची योजना आखली, तर काँग्रेसने ती स्वबळावर लढवण्याचा दावा केला

पत्नी बुरखा न घालता माहेरी गेली, संतापलेल्या पतीने पत्नी आणि दोन निष्पाप मुलींची हत्या केली, मृतदेह घरातील खड्ड्यात पुरले

मुंबईला मराठी महापौर मिळेल, भाजप नेते आशिष शेलार यांचा दावा

4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी! नवा नियम लागू होणार

पुढील लेख
Show comments