Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

त्र्यंबकेश्वर संत निवृत्तीनाथ मंदिराला सोन्याचा कळस

Webdunia
सोमवार, 23 मे 2022 (08:03 IST)
त्र्यंबकेश्वर : आज निवृत्तीनाथ महाराज मंदिरावर कळस रोहण कार्यक्रम उत्साहात झाला.यावेळी जमलेल्या वारकरी भाविकांनी निवृत्ती महाराज की जय अशा घोषणा देत फुले उधळली. तसेच बहुत दिवस होती मज आस ! आजी घडले सायासीरे!!' आजी सोनियाचा दिनु अशा शब्दात वारकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत संत निवृत्तीनाथांच्या  चरणी माथा टेकत दर्शन घेतले.

दुपारी १ वाजता हा कळस बसविण्यात आला. यावेळी १० हजार भाविकांनी हजेरी लावली होती. हा कळस बसविला गेल्याने वारकऱ्यांची अनेक दिवसांची इच्छा पूर्ण झाली आहे. तसेच सुवर्णकळस बसविल्याने मंदिराची शोभा वाढून मंदिर जीर्णोद्धार पूर्णत्वास गेला आहे.

यावेळी नामवंत कीर्तनकार व पुजक जयंत महाराज गोसावी , प्रसाद महाराज अंमळनेर ,अँड भाऊसाहेब गंभीरे ,संतवीर बंडातात्या कराडकर सहाय्यक धर्मदाय आयुक्त राम लीप्ते गंभीरे, खासदार हेमंत गोडसे  पोलिस निरीक्षक रणदिवे, त्र्यंबक नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने वारकरी विविध संस्था व दिंड्यांचे प्रमुख, प्रतिनिधी व निवृत्तीनाथ समाधी मंदिराचे विश्वस्त मंडळ उपस्थित होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: आदित्य ठाकरे शिंदेंच्या शिवसेनाला देशद्रोही टोळी म्हणाले

गोधरा रेल्वे घटनेतील आरोपीला चोरीच्या आरोपाखाली पुण्यात अटक

इंग्रजांना सलग १४ वर्षे सळो की पळो करून सोडणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक

या वंदे भारत ट्रेनमध्ये फक्त शाकाहारी जेवणच मिळेल, मांसाहारी जेवण घेऊन जाण्यास मनाई

वाघांच्या अवयवांचे चंद्रपूरमध्ये सापडले अवशेष, तस्करीचे थायलंडशी संबंध

पुढील लेख
Show comments