Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणाला मिळू नये,विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रदेश प्रमुख गोविंद शेंडे यांचे वादग्रस्त विधान

Webdunia
शनिवार, 6 जुलै 2024 (17:10 IST)
Vishwa Hindu Parishad facebook
विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रदेश प्रमुख गोविंद शेंडे यांनी लाडली बेहन योजनेबाबत वादग्रस्त विधान केले आहे. खरे तर महाराष्ट्रात लाडली बेहन योजनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करताच विश्व हिंदू परिषदेने त्याबाबत नवा वाद सुरू केला आहे.

ज्यांना दोन बायका आणि दोन पेक्षा जास्त मुले आहे त्यांना या योजनेचा लाभ देऊ नये. किंवा दोन पेक्षा जास्त बायका आणि मुले आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळू नये अशी अट सरकारने घालावी.असे म्हणणे विश्व हिंदू परिषदेचे आहे. ज्यांची संख्या जास्त आहे. असे लोक या योजनेचा लाभ घेत आहे. अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा क्षेत्र प्रमुख गोविंद शेंडे यांनी दिली. 

विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे आहे की काही खास लोक याचा वापर करतात, ज्यांची संख्या जास्त आहे, ज्यांना दोन बायका आहेत, त्यांना दोन फायदे होतील. ज्यांना 6 मुले आहेत त्यांना जास्त फायदा होईल. ज्याची एक पत्नी आहे त्याला फक्त एक फायदा होईल. ज्याला एक मूल असेल त्याला एकच फायदा मिळेल. ज्याला सरकारी लाभ घ्यायचा असेल त्याला लोकसंख्या नियंत्रण राबवावी लागणार.

लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी बंधने घालणे आवश्यक आहे. असे विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे आहे. त्या साठी त्यांनी सरकारला या योजनेत अशा अटी जोडण्याचे आवाहन केले आहे. या मुळे लोकसंख्या नियंत्रण होण्यात मदत होईल.हा विषय राष्ट्रहिताच्या असून त्यात धार्मिक भावना मिसळू नये असे विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे आहे. 
 
Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: भंडारा जिल्ह्यातील ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटातील रुग्णाचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

फडणवीस सरकारने एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयाला स्थगित केलं

मी ऑटो चालवायचो... अडीच वर्षांपूर्वी मी मर्सिडीजला ओव्हरटेक केले, शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मध्ये कोटींचा घोटाळा? काँग्रेसचा मोदी सरकारवर मोठा आरोप!

पुढील लेख
Show comments