Dharma Sangrah

Gram Panchayat Election :पराभूत उमेदवाराकडून हवेत गोळीबार, गुन्हा दाखल

Webdunia
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2023 (15:39 IST)
वालचंदनगर : ग्राम पंचायतीचा निकाल काल जाहीर झाला असून पराभूत झाल्यावर तालुका इंदापूरच्या वालचंदनगरच्या काझड गावात दहशत निर्माण करण्यासाठी उमेदवाराने हवेत गोळीबार करून पळून जाताना पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न  केला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. 

राहुल चांगदेव नरुटे व समीर मल्हारी नरुटे असे या आरोपींचे नाव असून सोमवारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे  निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत राहुल नरुटे व समीर नरुटे हे दोघे उभे होते.निकाल जाहीर झाल्यावर त्यांना पराभवाला सामोरी जावे लागले. या वरून संतापून राहुल नरुटे ने दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तूल काढून हवेत गोळीबार केले. पोलिसांनी या प्रकरणी त्यांच्या पाठलाग केला आणि एक चौकात गाडी अडवली. पोलीस माघारीवर आहे हे बघून त्यांनी पोलिसांवर गाडी घालत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. 

या प्रकरणी पोलीस हवालदाराने वालचंद पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे. 
 



Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

GDB संशोधन: भारतातील ३०% पेक्षा जास्त महिलांना बालपणातील लैंगिक हिंसाचाराचा सामना करावा लागला

दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या

LIVE: महायुती सरकारने २२ वर्षांचा रोडमॅप निश्चित केला

बिबट्याचा धुमाकूळ, रेस्क्यू ऑपरेशन सुरु

दिवाळी सण युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत सामील

पुढील लेख
Show comments