Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक दुर्घटनाः ड्रायव्हरचा लालच १० जणांच्या जीवावर बेतला

Webdunia
शनिवार, 29 ऑक्टोबर 2022 (15:31 IST)
पंधरवड्यापूर्वी भल्या पहाटे झालेल्या लक्झरी बस ट्रक दुर्घटनेत एकूण १३ प्रवासी मृत्युमुखी पडले. आगाऊ बुकिंग न करता यवतमाळ-नाशिक प्रवासादरम्यान बसमध्ये बसलेल्या दहा प्रवाशांचा मृतांमध्ये समावेश आहे. तसेच अपघातसमयी बसमध्ये चालकांसह साठ लोक होते यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल पोलिसांनी तयार केला आहे.
 
यवतमाळ येथून मुंबईला प्रवासी घेऊन जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या स्लीप कोच लक्झरी बस (एमएच  २९ एडब्लू ३१००) आणि आयशर ट्रक (जीजे ०५ बीएक्स ०२२६) यामध्ये जोरदार धडक झाली होती. धडकेनंतर संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यामुळे १२ प्रवासी होरपळून जागेवर ठार झाले होते, तर एका प्रवाशाने दोन दिवसांपूर्वी प्राण सोडले. ही भीषण दुर्घटना तपोवनाजवळ कैलासनगर चौफुलीवर शनिवारी (दि. ८) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली होती. 
 
अवघ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या या अपघाताने ट्रॅव्हल्सकडून केल्या जाणाऱ्या प्रवासी वाहतुकीसह रस्ता सुरक्षा व आपत्कालीन यंत्रणेची मदत अशा सर्वच बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. 
 
प्राणही गेले अन् साडेतीन लाखांची रोकडही जळाली
> यवतमाळ येथून नाशिकला कार खरेदीसाठी येत असलेल्या एका प्रवाशाचा या दुर्घटनेत नाशिकमध्येच मृत्यू झाला.
> कार खरेदीसाठी सोबत असलेल्या बॅगेत त्याने सुमारे साडेतीन लाख रुपये घेतलेले होते. या रोकडचीही राख झाल्याचे पोलिसांच्या तपासातून पुढे आले आहे.
> त्या प्रवाशाने नाशिकमध्ये राहणाऱ्या आपल्या भाच्याला प्रवासादरम्यान मी नाशिकला कार घेण्यासाठी येत असल्याचे फोनवरून कळविलेसुद्धा होते.
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Makeup Tricks : हिवाळ्यात तुमची लिपस्टिक आणि आयलायनर कोरडे झाले आहेत का? या टिप्स वापरा

मुलांमध्ये खोकला कमी करण्यासाठी हे ५ घरगुती उपाय वापरून पहा

Valentine week days list जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीक लिस्ट, असे व्यक्त करा तुमचे प्रेम

अकबर-बिरबलची कहाणी : चोराच्या दाढीतला एक ठिपका

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

सर्व पहा

नवीन

LIVE: हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे नवे अध्यक्ष

काँग्रेसने महाराष्ट्र संघटनेत मोठे बदल केले, हर्षवर्धन सपकाळ यांची नवे प्रदेशाध्यक्षपदी निवड

वाढदिवसाच्या पार्टीला न नेल्याने नाराज झालेल्या अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू

शिवसेना युबीटीसोबत मनसेला देखील मोठा धक्का, राजन साळवींसह या नेत्यांनी पक्ष बदलला

पुढील लेख
Show comments