Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ: 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

Webdunia
मंगळवार, 19 एप्रिल 2022 (13:07 IST)
राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक घरावरकट रचून आंदोलकांना हल्ला करण्यासाठी  उकसवल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. आता गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte)यांना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात वकिल गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. तर त्यांच्या पत्नी डॉ. जयश्री पाटील (Jayashri Patil) यांना देखील अटक होण्याची शक्यता होती, मात्र त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) दिले आहे.
 
मराठा आरक्षण प्रकरणात माध्यमांशी बोलताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सदावर्तेंवर साताऱ्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणात सातारा पोलिसांनी त्यांना अर्थर रोड तुरुंगातून ताब्यात घेतलं होतं. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांना मुंबईतील गिरगाव न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अर्थर रोड तुरुंगातून सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
 
सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण; सदावर्तेंच्या पत्नी डॉ. जयश्री पाटील यांना दिलासा
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कोल्हापुर, बीड, पुणे, अकोला अशा अनेक ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे. साताऱ्यानंतर आता अकोला पोलिसांनी देखील सदावर्तेंना ताब्यात घेण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली आहे. त्यामुळे आता त्यांना अकोला पोलीस ताब्यात घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर कोल्हापूरचे पथक देखील सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहे. त्यामुळे आता सदावर्ते यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 
 

संबंधित माहिती

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

कारमधून मिळाले दोन मृतदेह, मुंबई होर्डिंग अपघात 16 जणांचा मृत्यू

नागपूर मध्ये फ्लाईओपर वरून उडी घेतली महिलेने

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

मुलगा आणि मुलीच्या प्रेमापोटी संपुष्टात आली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पार्टी- अमित शाह

मध्यप्रदेशात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, एक गंभीर

भारताने चीन सीमेजवळ टँक रिपेअर युनिट उभारले, पाकिस्तानची अवस्था बिकट

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

पुढील लेख
Show comments