Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जेष्ठांना गंडविणाऱ्या भामट्याला ठोकल्या बेड्या

Webdunia
गुरूवार, 22 जुलै 2021 (08:07 IST)
नाशिकमध्ये  वयस्कर नागरिकांना एटीएममधून पैसे काढून देण्यासाठी मदत करतो असं सांगून अनेक ज्येष्ठ नागरिकांना हजारो रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्याला बेड्या ठोकण्यात येवला पोलिसांना यश आलं आहे.
याबाबत असे की, ज्येष्ठ नागरिकांना एटीएममधून पैसे काढून देण्यासाठी मदत करतो असं सांगून फसवणूक करायचा. तो एटीएमजवळ उभा राहायचा. तिथे येणाऱ्या वयस्कर नागरिकांना एटीएममधून पैसे काढून देण्यासाठी मदत करतो, असं सांगायचा. काही ज्येष्ठ नागरिक त्याला एटीएमचा पिनही सांगायचे. पण एटीएममधून पैसे यायचे नाहीत. खरंतर तो पैसे काढायचाच नाही. तो वयस्कर नागरिकांना एटीएममध्ये पैसे नाहीत. त्यामुळे दुसऱ्या कुठल्या एटीएममधून पैसे काढावे लागतील, असं सांगायचा.
 
यावेळी आरोपी वयस्कर नागरिकांचे एटीएम कार्ड बदलून घ्यायचा. त्यानंतर तो वयस्कर नागरीक गेले की एटीएममधील पैसे काढायचा. अशाप्रकारे त्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना हजारो रुपयांचा गंडा घातला. याबाबतची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. या सापळ्यानुसार आरोपीला रंगेहाथ पकडण्यास पोलिसांना यश आलं.
पोलिसांनी त्याच्याजवळील सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या कारवाईवर शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments