Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सावधान राज्यात उष्णतेची लाट तर महाबळेश्वर पोहोचले ४० डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत

सावधान राज्यात उष्णतेची लाट तर महाबळेश्वर पोहोचले ४० डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत
मागील दोन दिवसांपासून राज्यात उन्हाचा पारा वाढत असून, थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर आणि कोकण वगळता इतर सर्व ठिकाणी तापमान 40 अंशाच्या पुढे गेले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकोला येथे 46.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाले असून, या उन्हाळ्याच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान आहे.
 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 2 दिवसांपासून राज्यातील किमान तापमाना सोबतच कमाल तापमानातही लक्षणीय वाढले आहे. तर येत्या 29 एप्रिलपर्यंत राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. या लाटेमुळे  विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 
 
राज्यात अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, ब्रह्मपूरी, परभणी या ठिकाणी तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे होता. तर अहमदनगर, जळगाव आणि सोलापूर या विविध जिल्ह्यांमध्ये 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये तापमानाने चाळीस डिग्री तपमान नोंदवले गेले आहे.
 
राज्यातील प्रमुख शहरातील तपमान पुढील प्रमाणे :
 
चंद्रपूर – 45.6 अंश सेल्सिअस
नागपूर – 45.2 अंश सेल्सिअस
अहमदनगर – 44.9 अंश सेल्सिअस
जळगाव – 44.4 अंश सेल्सिअस
सोलापूर – 44.3 अंश सेल्सिअस
सांगली – 43 अंश सेल्सिअस
पुणे – 42.6 अंश सेल्सिअस
नाशिक – 41.7 अंश सेल्सिअस
सातारा – 41.6 अंश सेल्सिअस
कोल्हापूर – 41 अंश सेल्सिअस
महाबळेश्वर – 36 अंश सेल्सिअस
मुंबई – 34 अंश सेल्सिअस
रत्नागिरी – 33.2 अंश सेल्सिअस

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देवेंद्र फडणवीस यांची आघाडी, राज ठाकरे, भुजबळ यांच्यावर जोरदार टीका