Dharma Sangrah

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप झालेल्या आमदार संजय राठोडांचा समावेश झाल्याने जोरदार टीका

Webdunia
मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (14:27 IST)
मंत्रिमंडळात शिंदे गटातून पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप झालेल्या आमदार संजय राठोडांचा समावेश झाल्याने जोरदार टीका होत आहे. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस, चिंत्रा वाघ यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांनी तत्कालीने ठाकरे सरकारला धारेवर धरलं होतं. आता त्याच राठोडांना आपल्या मंत्रिमंडळात घेतल्याने विरोधक आक्रमक झालेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टकरण देत आपली भूमिका मांडली.
 
एकनाथ शिंदे म्हणाले, “महाविकासआघाडी सरकारच्या काळात पोलिसांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिली होती. यानंतरही कुणाचे काही विचार असेल, म्हणणं असेल तर नक्की सांगा, ते ऐकून घेतलं जाईल. लोकशाहीत प्रत्येकाला भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे.”
 
“सर्वांना माहिती आहे की, पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास केला. त्या तपासात काहीच निष्पन्न झालं नाही. त्यामुळे त्यांना क्लीन चिट देण्यात आली. म्हणून राठोडांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
 
चित्रा वाघ यांनीही घेतला आक्षेप
संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे,” असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

पुणे न्यायालयात सावरकर मानहानीचा वाद पेटला, सावरकर कुटुंबाने राहुल गांधींच्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

World Wildlife Conservation Day 2025 आज वन्यजीव संवर्धन दिन, इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

पुण्यातील हवा विषारी झाली, AQI ३३६ सह मुंबईपेक्षाही अधिक धोकादायक: आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईत देशाची पहिली शहरी सुरंग बनेल, जाणून घ्या ही कशी खास आहे?

Koregaon Park Land Scam मुख्य आरोपी शीतल तेजवानीला अखेर अटक

पुढील लेख
Show comments