rashifal-2026

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरूच

Webdunia
गुरूवार, 22 जुलै 2021 (08:31 IST)
आगामी पाच ते सहा दिवस मराठवाड्यासह राज्यातील विविध भागात अती पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामध्ये मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याचा समावेश आहे. अती पावसाचा इशारा देण्यासाठी हवामान विभागाच्या वतीने ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात येतो. म्हणजे या भागामध्ये अती पाऊस पडण्याची शक्यता असते.
 
मराठवाड्यात गेल्या महिन्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. मात्र, उशीरा का होईना मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला. मात्र, आता पुन्हा अती पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. वास्तविक काही दिवसांपूर्वी देखील मराठवाड्यातील काही भागात अती पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
अति पावसाचा इशारा देण्यात आलेल्या जिल्ह्यामध्ये २२ जुलै रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात हवामान विभागाच्या वतीने ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर इतर जिल्ह्यातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच औरंगाबाद विभागात सर्वदूर चांगल्या पावसाची शक्यात वर्तवण्यात आली आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

केंद्रीय अर्थसंकल्प 2026 LIVE: अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सलग नववे अर्थसंकल्प सादर करणार

बजेटपूर्वीच व्यावसायिक गॅस सिलिंडर महागले, नवीन दर जाणून घ्या

LIVE: सुनेत्रा पवार फडणवीस मंत्रिमंडळात तीन महत्त्वाची खाती सांभाळतील

देशातील पहिले वकील प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र महाराष्ट्रात सुरू, मुख्यमंत्री फडणवीस आणि माजी सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते उद्घाटन

IND vs NZ: सूर्यकुमार यादवने T20I मध्ये विश्वविक्रम रचला

पुढील लेख
Show comments