rashifal-2026

मुंबई सावधान पाऊस आज २४ तासात कोसळणार जोरदार

Webdunia
शनिवार, 27 जुलै 2019 (08:58 IST)
केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) राज्यातील काही भागात पुढील 3 दिवसांत पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली असून, उत्तर तसेच दक्षिण गोवा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील अनेक नद्यांना पूर येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. सोबतच काही लहान धरणे ओव्हरफ्लो होऊन फुटण्याची शक्यताही वर्तवली आहे. मुंबईसह ठाणे आणि रायगडमध्ये पुढील २४  तासात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे मुंबई आणि उपनगरांत अनेक ठिकाणी पाणी साचले होते. संध्याकाळी ७ वाजल्यापासून अंधेरीत 36 मिमी, दादरमध्ये 20 मिमी तर कुर्ल्यात 22 मिमी पावसाची नोंद झाली. अंधेरी सबवेमध्ये पाणी भरल्याने हा सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. भांडुपमध्ये एलबीएस मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्याने पाणी भरले होते. दादर पूर्व, हिंदमाता, किंग्जसर्कल येथेही पाणी भरले होते. मध्य, हार्बर आणि पश्चिम या मार्गांवरील लोकलसेवा सुरळीत आहे. तर रस्ते वाहतूक मात्र मंदावली. मध्यरात्री सुद्धा  मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. शहर आणि उपनगरातील सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाल्यानं काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. भांडूप, अंधेरी, दादर, हिंदमाता, वांद्रे, माटुंगा, वडाळा, चर्चगेट या भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

Sarojini Naidu Death Anniversary सरोजिनी नायडू पुण्यतिथी

युद्धामुळे शेअर बाजार कोसळला

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून भाविकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

टीम इंडियाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले

अजित पवारांचा मृत्यू १००% कट, विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला

पुढील लेख
Show comments