Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राऊत यांच्या जामिनावर तत्काळ स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

Webdunia
गुरूवार, 10 नोव्हेंबर 2022 (08:12 IST)
संजय राऊत यांच्या जामिनावरील सुटकेचे आदेश देणाऱ्या विशेष PMLA न्यायालयाच्या आदेशावर त्वरीत स्थगिती देण्याची EDची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने ईडीच्या अपिलावर गुरुवारी सुनावणी ठेवली आहे. विशेष पीएमएलए पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी बुधवारी शिवसेना नेते संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची जामिनावर सुटका केली. या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती ईडीने विशेष न्यायालयाला केली. मात्र, विशेष न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळली. त्यामुळे विशेष न्यायालयाच्या  आदेशाला स्थगिती मिळावी, यासाठी ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. भारती डांग्रे यांच्या एकलपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. दोन्ही बाजू ऐकल्याशिवाय आदेश देऊ शकत नाही, असे म्हणत न्या. डांग्रे यांच्या एकलपीठाने विशेष न्यायालयाच्या आदेशाला त्वरीत स्थगिती देण्यास नकार दिला.
 
‘मी विशेष न्यायालयाचा आदेशही वाचला नाही. कशाच्या आधारावर जामीन मंजूर करण्यात आला आहे, हे सुद्धा मला माहीत नाही. तसेच कशाच्या आधारावर तुम्ही (ईडी) या आदेशाला आव्हान देत आहात, ते ही माहीत नाही. प्रतिवाद्यांचे म्हणणे ऐकल्याशिवाय मी स्थगितीचा आदेश कसा देऊ?’ असे उच्च न्यायालयाने म्हटले.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

ठाणे : वेश्याव्यवसायात अडकल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल, तरुणीची सुटका

नौदलाच्या पाणबुडीला मासेमारीची बोटची धडक दोघांचे मृतदेह बाहेर काढले

LIVE: महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागे घेतला

पुढील लेख
Show comments