Dharma Sangrah

200 जणांवर मधमाशांनी हल्ला

Webdunia
शुक्रवार, 3 मे 2019 (16:52 IST)
पुण्यातल्या वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे येथे चार दिवसीय उन्हाळी शिबिरासाठी दाखल झालेल्या 151 शालेय विद्यार्थ्यांसह 200 जणांवर मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात शिक्षकांसह ७ जण जखमी झाले आहेत. मे ते 5 मे या कालावधीत आयोजित केलेल्या ‘शिवशौर्य साहसी बालसंस्कार शिबीर, शिवतीर्थ राजगड’ या चौथ्या चार दिवसीय उन्हाळी शिबिरात 151 शालेय विद्यार्थी, 34 स्वयंसेवक आणि 15 शिक्षक असे 200 जण सहभागी झाले होते.
 
शिबिराच्या पहिल्याच दिवशी गुंजवणे येथील समाजमंदिरात शिबिरार्थी मुलांची सोय करण्यात आली होती. विद्यार्थी वाहनातून उतरून मंदिरात जाऊन बसत होते. इतक्यात मंदिराशेजारी असणाऱ्या ‘वेळाच्या झाडा’वरील आग्या मोहोळीतील मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. यानंतर सर्व विद्यार्थी सैरावैरा पळू लागले. विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहून गुंजवणे आणि चिरमोडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी मंदिराकडे धाव घेतली. जखमींवर करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

Flashback २०२५ मध्ये या बॉलीवूड अभिनेत्रींनी रेड कार्पेट फॅशनला नव्या अंदाजात सादर केले

पंतप्रधान मोदींनी लखनौमध्ये 'राष्ट्र प्रेरणा स्थळ'चे उद्घाटन केले

आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट किलिमांजारोवर टांझानियन हेलिकॉप्टर कोसळले, पाच जणांचा मृत्यू

Vijay Hazare Trophy विजय हजारे ट्रॉफीत एका दिवसात 22 शतकं

BMC Elections काँग्रेसने यूबीटी-मनसे युतीपासून स्वतःला दूर केले; निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय

पुढील लेख
Show comments