Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भर दुष्काळात लातूरच्या त्या विहिरीकडे दुर्लक्ष, भागवली होती ७२ सालात तहान

भर दुष्काळात लातूरच्या त्या विहिरीकडे दुर्लक्ष, भागवली होती ७२ सालात तहान
, बुधवार, 29 मे 2019 (18:03 IST)
फाईल फोटो
प्रशासन जागे नसेल तर कश्या प्रकारे अडचणी वाढतात याचा उत्तम नमुना दुष्काळी लातूरमध्ये पहायला मिळतो आहे. ही बातमी आहे एका विहरीची जी शहरातील मध्यभागी असून भर उन्हात त्यात चक्क पाणी आहे. मात्र या विहरीकडे मनापा आणि त्या भागातील नगरसेवकाने इतके दुर्लक्ष केले आहे कि त्या विहारीतील पाणी खराब झाले आहे. 
 
लातूर शहरातील गोरक्षणच्या १०५ फुटी ऐतिहासिक विहिरीत ७० ते ७५ फूट पाणी अजूनही दिसते आहे. जर येथून पाणी उपसल तर पुन्हा विहीर परत भरते,  या विहिरीनं १९७२ च्या दुष्काळात लातुरकरांची तहान भागवली होती, मात्र  नंतर विहिरीचा उपयोग फक्त गणपती विसर्जनासाठी करण्यात आला होता. परत जेव्हा २०१६ मध्ये भीषण पाणी टंचाई आली तेव्हा सुकाणू समितीनं प्रशासनाच्या मागे लागून या विहिरीचं खोलीकरण करुन घेतलं, गाळ काढून घेतला. मग या विहिरीतून गोरक्षणवासियांना पाणी मिळालं होते. रोज २० ते २५ टॅंकर शहरासाठी जाऊ लागले. पुन्हा पाऊस झाला अन सगळे या विह्ररीला पुन्हा विसरुन गेले होते. मग नंतर मनपाने वीज पुरवठा बंद केला. सोबतच पाणी काढायची मोटारही काढून नेली.
 
मात्र आज दुष्काळी स्थितीत या विहिरीत मुबलक पाणी आहे. मात्र शहरात बाहेरुन पाणी आणले जाते. पण शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या जीवंत आणि खात्रीच्या स्रोताकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. या भागातले नगरसेवकही याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. निवडणुकीपुरते येतात पुन्हा तोंडही दाखवत नाहीत असा आरोप या भागातील नागरिक करतात. त्यामुळे आता या विहिरीची योग्य काळजी घेतली आणि तिला स्वच्छ केले तर त्या भागातील नागरिकांचे काही प्रमाणात तहान भागवली जाऊ शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ICC World Cup 2019 : उद्यापासून क्रिकेटच्या सामन्यांना सुरुवात