rashifal-2026

ईव्हीएममध्ये गडबड केल्याशिवाय ४०० पार अशक्य- प्रकाश आंबेडकर

Webdunia
शुक्रवार, 8 मार्च 2024 (09:02 IST)
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने ‘अब की बार ४०० पार’ असा नारा दिला आहे. त्यांची सगळी मदार ईव्हीएम मशिनवर आहे. ईव्हीएममध्ये गडबड केल्याशिवाय हे अशक्य आहे, असा दावा करताना, ईव्हीएम मशिन कशी हॅक कशाप्रकारे होऊ शकते याचे सादरीकरण वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केले. ईव्हीएममधील हॅकिंग थांबविण्यासाठी मतदानानंतर व्हीव्हीपॅटची पावती पडताळणीसाठी मतदारांना मिळायला हवी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.
 
महाआघाडीत वंचितच्या समावेशाबद्दल अजूनही बोलणी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम मशिन कशी हॅक केली जाते याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्या नंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, मतदानानंतर व्हीव्हीपॅटची पावती मतदारांना मिळायला हवी. त्याची पडताळणी केल्यानंतर ती बॅलेट बॉक्समध्ये टाकावी. या संदर्भात आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटून ही मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा युतीचा फॉर्म्युला तयार, नवी मुंबईवरील गतिरोध, या भागात मैत्रीपूर्ण लढती

गोवा क्लब घटनेनंतर फरार झालेल्या लुथरा बंधूंना थायलंडमध्ये अटक; २५ जणांच्या मृत्यूप्रकरणी भारतात प्रत्यार्पण करणार

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकत्वासाठी १ दशलक्ष 'गोल्ड कार्ड' व्हिसा जारी केले, जाणून घ्या त्याचे फायदे काय असतील

इलेक्ट्रिक वाहनांकडून टोल वसुली 'बेकायदेशीर' आहे, सभापती राहुल नार्वेकर यांनी दिला ८ दिवसांचा अल्टिमेटम

LIVE: सभापती राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांची मागणी फेटाळली

पुढील लेख
Show comments