Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काळजाचा ठोका चुकवणारी घटना, अलिबागेत दोन महिला पॅरासेलिंग करताना दोर तुटला

Webdunia
रविवार, 5 डिसेंबर 2021 (11:09 IST)
प्रतीकात्मक चित्र -रायगडच्या अलिबागेत सहलीला जाण्याच्या बेत काहींनी आखला आणि अलिबागेत  पॅरासेलिंग करताना दोघी मैत्रिणींसह जे काही घडले त्याची कोणीच कल्पना केली नसणार. या दोघी महिला  पॅरासेलिंग करताना त्यांच्या बचावासाठी बोटीला बांधलेला दोर तुटला आणि त्या दोघी 100 मीटर उंचीवरून समुद्रात पडल्या. त्यांना समुद्रात पडताना बघून सर्वांचा काळजाचा ठोका चुकला. सुदैवाने त्यांनी घातलेल्या लाईफ जॅकेट्स मुळे दोघी बोटी पर्यंत तरंगत पोहचल्या.
या दोघी महिला मुंबईतून आलेल्या असून त्या जखमी झाल्या आहे .या महिलांचे नाव सुजाता नारकर आणि सुरेखा पाणीकर असे आहेत. हा धक्कादायक प्रकार 27 नोव्हेंबर रोजी अलिबागच्या वर्सोली बीचवर घडला. मुंबईतून या महिला पर्यटनासाठी अलिबाग आल्या. पॅरासेलिंग करताना त्यांच्या सोबत हा प्रकार घडला. 
पॅरासेलिंग करताना त्यांची दोर तुटली आणि त्या दोघी उंचीवरून समुद्राच्या पाण्यात मध्यभागी पडल्या. त्याच क्षणी बोटीवर असलेले जीवरक्षकांनी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेत त्यांना वाचवले. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. या अपघातामुळे पर्यटकांचा सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्न निर्माण होत आहे. 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments