Festival Posters

वादग्रस्त निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अटक, दीड वर्षापासून होते फरार

Webdunia
मंगळवार, 16 जानेवारी 2024 (09:51 IST)
मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने निलंबित करण्यात आलेले जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले हे गेल्या दीड वर्षापासून फरार होते. अखेर सोमवार दि.१५ जानेवारी रोजी सकाळी ते पोलीस अधिक्षक कार्यालयात शरण आले आहे.
 
मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करणारी ऑडियो क्लीप व्हायरल झाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक किरणकुमार बकाले चर्चेत आले होते. समाजात तेढ निर्माण केल्याचा प्रकार किरणकुमार बकाले यांनी केला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात विनोद देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार हे दीड वर्षांपासून फरार होते. त्यांचे निलंबन करून नाशिक येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतू ते हजर न होता फरार झाले होते.
 
किरणकुमार बकाले यांनी न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र न्यायालयाकडून त्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळून लावला होता. त्यामुळे बकाले यांच्या पदरी‍ निराशा पडली होती. यातच पोलीस प्रशासनाने त्यांची मालमत्ता जप्त करण्याबाबत न्यायालयात अर्ज केला होता. अडचणीत वाढ होत असल्याने अखेर किरणकुमार बकाले यांनी सोमवारी १५ जानेवारी रोजी सकाळी पोलीस अधिक्षक कार्यालयात येवून हजर झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्याकडे बकाले यांना हजर करण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे.

Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

दोन दिवसांत चार आयपीएल सामने खेळले जातील, आरसीबी, मुंबई इंडियन्स आणि सीएसके सारखे संघ आपापल्या सामन्यांसाठी मैदानावर उतरतील

Jyotiba Phule Jayanti 2026 Speech महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त सुंदर भाषण

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना लावला 'पूर्णविराम'; शशिकांत शिंदे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली

LIVE: पुण्यातील ७१० कोटी रुपयांचा कात्रज-कोंढवा रस्ते प्रकल्प भूसंपादनातील अडथळ्यांमुळे रखडला

'लाडकी बहीण योजना' बंद करा... मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला असे का म्हटले? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

पुढील लेख
Show comments