Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शब्द पाळायचा की खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीनेच ठरवावं : राजू शेट्टी

Webdunia
शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (16:51 IST)
कोल्हापूर: राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावातून राष्ट्रवादीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची चर्चा आहे. त्यावरून राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला आहे. ठरलेला समझोता पाळायचा की पाठीत धारदार खंजीर खुपसायचं हे राष्ट्रवादीनेच ठरवायचं आहे, असा हल्लाबोल राजू शेट्टी यांनी केला आहे.
 
राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादीवर घणाघाती हल्ला चढवला. आमदारकी द्यावी की देऊ नये हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे. तो साधा समझोता आहे. राजकारणात असे समझोते होत असतात. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षात हा समझोता झाला होता. तो पाळायचा की नाही पाळायचा की पाठीत खंजीर खुपसायचा आणि कशा पद्धतीने पाळायचा हे ज्यांनी शब्द दिला त्याने ठरवायचं आहे. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो, असं शेट्टी म्हणाले.
मला त्या यादीतून का वगळण्यात आलं हे राष्ट्रवादीचे नेते सांगू शकतील. डावललं की नाही हे मलाही माहीत नाही, असं सांगतानाच ‘करेक्ट कार्यक्रमा’च्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन, असा इशाराही त्यांनी दिला. मी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे म्हणून मला डावलले गेले आहे. मी हाडाचा कार्यकर्ता आहे. मला आमदारकी काही मिळो न मिळो माझे आंदोलन सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पूरग्रस्तांच्या मदतीवरून शेट्टी यांनी यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकारवर सडकून टीका केली. पूरग्रस्तांना मदत मिळावी म्हणून त्यांनी कोल्हापूर ते नरसिंहवाडीपर्यंत पदयात्रा काढली आहे. या पदयात्रेचा आज चौथ्या दिवस असून आजही पदयात्रा रांगोळी गावात आली. यावेळी त्यांचे महिला वर्गाने जंगी स्वागत केलं. राज्य सरकारकडून आम्हाला अजून कोणतेही आश्वासन आले नाही. आम्ही आमच्या जलसमाधीवर ठाम आहोत. जोपर्यंत शेतकऱ्यांना व पूरग्रस्तांना मदत मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
केंद्र सरकारने गुजरातला जशी मदत केली तशी मदत महाराष्ट्राला करावी. भाजप नेते धुतल्या तांदळासारखे नाहीत. तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांना व पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडले आहे. सरकारने वेळीच शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, नाही तर बळीराजा रस्त्यावर येऊन आक्रोश करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रातून आणलेली वाघीण झीनत सिमिलीपाल अभयारण्यात सोडली

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, भाजप पुन्हा कोणता निर्णय घेणार?

महायुतीच्या विजयामुळे शेअर बाजारात त्सुनामी, गुंतवणूकदारांनी 2 दिवसात 13 लाख कोटींची कमाई

वडिलांनी आपल्या जुळ्या मुलींना विष देऊन ठार केले, नंतर गळफास घेतला

लाडकी बहीण योजनेचा प्रभाव तर आहे, निकालानंतर शरद पवार यांनी स्वीकारले

पुढील लेख
Show comments