Marathi Biodata Maker

औरंगाबाद निषेधार्ह; सरकार कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयशी - जयंत पाटील

Webdunia
सोमवार, 14 मे 2018 (14:42 IST)

काल रात्री    औरंगाबाद  येथे दोन गटांत किरकोळ वाद होऊन त्याचे पर्यावसान दंगलीत झाले. या घटनेचा निषेध करताना भाजप सरकारला महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था टिकवण्यात अपयश आले आहे हेच यावरून दिसून येते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष   जयंत पाटील   यांनी केली आहे.

क्षुल्लक कारणावरून दोन समाजांत तेढ निर्माण होऊन त्याचे दंगलीत रूपांतर होत असताना सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. अशा परिस्थितीत रात्रभर पोलिस काय करत होते आणि पर्यायाने गृहखाते काय करत होते, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

सत्तारूढ पक्षाचे प्रमुख नेते रस्त्यांनी फिरून एका गटाची बाजू घेत भांडण मिटवण्याऐवजी आणखी वाद वाढवत आहेत. तणाव निर्माण व्हावा अशी या सरकारची मानसिकता का, असेही ते म्हणाले. दंगल सरकार थांबवू शकले नाही, पण आता या घटनेतील आरोपींना पकडण्याचे काम तरी सरकारने करावे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

New Year 2026 Wishes in Marathi नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

बीड जिल्ह्यात नववीच्या एका विद्यार्थिनीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली

LIVE: नामांकनाच्या शेवटच्या दिवशी भाजप शिवसेनेतील युती14 ठिकाणी तुटली

पुसदमध्ये तरुणाने स्वतःच्या मृत्यूची पोस्ट टाकत गळफास घेत केली आत्महत्या

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेऊन दीप्ती शर्माने इतिहास रचला

पुढील लेख
Show comments