Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पत्रकाराची पत्नी म्हणाली अन्यथा.. कुटुंबासमवेत आत्मदहन !

Webdunia
मंगळवार, 13 एप्रिल 2021 (08:20 IST)
अहमदनगर राहूरी येथील पत्रकार रोहिदास दातीर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपीस तातडीने अटक केली नाही तर कुटुंबासमवेत आत्मदहन करण्याचा इशारा मयत पत्रकार रोहिदास दातीर यांची पत्नी सविता दातीर यांनी दिला आहे.राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना निवेदनाद्वारे सविता दातीर यांनी हा इशारा दिला आहे. ६ एप्रिल रोजी पत्रकार रोहिदास दातीर यांचे राहूरी शहरातून अपहरण करून त्यांची हत्या करून मृतदेह राहूरी कॉलेज जवळ टाकून दिला होता.
 
पोलिसांनी या प्रकरणी लाल्या उर्फ अर्जुन माळी व तौफिक शेख यांना अटक केली. मात्र मुख्य आरोपी कान्हू मोरे व अक्षय चितळे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही.दरम्यान रोहिदास दातीर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना तातडीने अटक न केल्यास कुटुंबासमवेत आत्मदहन करू असा इशारा मयत रोहिदास दातीर यांची पत्नी सविता यांनी राहूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शीर का कापले? कथा वाचा

सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय

या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षांना दिल्या शुभेच्छा!

शिंदे यांना हटवल्यानंतर शिवसेनेत एक नवीन 'उदय' होईल असे म्हणत संजय राऊतांनी भाजपवर टीका केली

LIVE: काँग्रेस आणि शिवसेना युबीटी पक्षात मोठी फूट पडणार-शिवसेना नेते राहुल शेवाळे

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक मंचाचे संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची भेट घेतली

शेतकरी आणि पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये हिंसक संघर्ष, पोलिस उपअधीक्षकांचा हात मोडला

पुढील लेख
Show comments