नाशिकमधून निघालेला किसान लाँग मार्च अखेर स्थगित झाला आहे. यावेळीही गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून शेतकऱ्यांची समजूत काढली आहे. आंदोलकांच्या मागण्यांचा विचार करण्याचं लेखी आश्वासन सरकारकडून गिरीश महाजन यांनी आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.