Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक-पुणे महामार्गावर विहिरीत बिबट्याचे बछडे पडले; चार तासाच्या प्रयत्नानंतर काढले बाहेर

Webdunia
शुक्रवार, 25 मार्च 2022 (21:25 IST)
नाशिक-पुणे महामार्गावर बायपास परिसरात असलेल्या एका शेतात बिबट्याचे बछडे विहिरीत पडल्याची घडल्याची घटना घडली. रात्रीची वेळ असल्याने आसपासचे कुत्रे जोरात भुकतांना दिसताच अशातच विहिरीत जोऱ्यात काहीतरी पडल्याचा आवाज झाला. शेतकरी यांना कुत्रा विहिरीत पडल्याचा भास झाल्याने शेतकऱ्याने विहिरीकडे धाव घेतली. पण तो कुत्रा नसून बिबट्याचे बछडे असल्याचे शेतकऱ्याच्या निदर्शनास आले. अशा वेळेस आसपासच्या नागरिकांनी वन विभागाला पाचारण करून चार तासाच्या प्रयत्नानंतर बछड्यालाला बाहेर काढण्यात वनविभाग कर्मचार्‍यांना यश आले.
 
घटनेचे सविस्तर वृत्त असे की नाशिक पुणे बायपास परिसरात गोविंद काशिनाथ भाटजिरे यांची शेतजमीन आहे. या शेतजमीनीत मजूरांची वस्ती असून जवळच विहिर आहे. रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास कुत्रे भुंकण्याचा व धावण्याचा आवाज आला. याचवेळी विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज मजूरांना आला. त्यांनी भाटजिरे यांना घटनेची माहिती देऊन विहिरीत कुत्रे पडल्याचे सांगितले. विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरत असल्याने रातोरात विहिरीत पडलेले कुत्रे बाहेर काढण्याचा निर्णय भाटजिरे व मजूरांनी घेतला. दोरखंड आणून विहिरीत सोडण्यात आला. बॅटरी लावल्यानंतर ते कुत्रे नसून बिबट्या असल्याचे दिसताच सर्वांना धक्का बसला. भाटजिरे यांनी तात्काळ वनविभागाला बिबट्या विहिरीत पडल्याचे सांगत त्याचे प्राण वाचविण्याची विनंती केली. वनपरिक्षेत्र अधिकारी मनिषा जाधव यांनी पश्चिम उपविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, नाशिक विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर वनविभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी रवाना केले. विहिरीला कथडे नसल्याने व उतार असल्याने विहिरीत शिडी किंवा पिंजरा सोडणे अवघड काम होते. त्यामुळे घटनास्थळी हायड्रोलिक बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
रात्री अकरा वाजेच्या सुमारास हायड्रोलिक दाखल झाले. त्याद्वारे विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने व विहिरीत बॅटऱ्या व मोबाईल चमकविणाऱ्यांची संख्या वाढल्याने भेदरलेला बिबट्या पिंजऱ्यात जात नव्हता. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्वांना विहिरीपासून दूर करत केवळ एक बॅटरी सुरु ठेवून रेस्क्यू राबविले. थोड्या वेळाने पिंजऱ्यात बिबट्या गेल्यानंतर हायड्रोलिकच्या सहाय्याने पिंजरा व बिबट्याला विहिरीतून सुखरुप बाहेर काढण्यात आले. यावेळी रात्रीचे साडेबारा वाजले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी मनिषा जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली वनपाल सुजीत बोकडे, रोहित लोणारे, किरण बोजहाडे, पोपट बिन्नर, तुकाराम डावरे, बालम शेख यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी सदर मोहिम फत्ते केली. भक्ष्याचा पाठलाग करतांना सदर एक वर्षाचा बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेस वर टोला

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

LIVE: अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

पुढील लेख
Show comments