Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाळासाहेबां प्रमाणेच शरद पवार घाणेरडे राजकारणाचा बळी- संजय राऊत

sanjay raut
, मंगळवार, 2 मे 2023 (20:38 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या शरद पवारांच्या घोषणेने महाराष्ट्रातील राजकारण्यांना आश्चर्याचा धक्का बसला असतानाच, शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू मानले जाणारे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पवारांची तुलना बाळासाहेब ठाकरेंशी केली. बाळासाहेबांनीही घाणेरडे राजकारण आणि आरोपांना कंटाळून आपल्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता असे ते म्हणाले. तसेच शरद पवार भाकरी फिरवणार होते पण त्यांनी तर पुर्ण तवाच फिरवला असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
 
आपल्या ट्विटर हँडलवर शरद पवार यांच्या या निर्णयावर लिहीताना ते म्हणाले, “इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. बाळासाहेंबानाही शिवसैनिकांच्या प्रेमापोटी आपला निर्णय मागे घ्यावा लागला होता. बाळासाहेबांप्रमाणेच पवार साहेबही राज्याच्या राजकारणाचा आत्मा आहेत,” असं त्यांनी ट्विट केलं आहे.
 
खासदार संजय राऊत यांनी 2024 च्या निवडणुकीच्या वर्षभरअगोदर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडीचे संकेत दिले होते. संजय राऊत यांनी शरद पवारांवर पद सोडण्यासाठी पक्षातून दबाव असल्याचे खुद्द शरद पवार यांनीच सांगितले आहे असा गौप्यस्फोट केला होता.
 
शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे भाजपला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीपासून दुर जाण्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. या अफवांना पक्षाने पूर्णविराम दिला असतानाच, शरद पवार यांनी मंगळवारी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला. शरद पवार “भाकरी फिरवणार असा संकेत होता…पण त्यांनी तवाच फिरवला.” असा विधान त्यांनी केले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरद पवार निवृत्तीच्या निर्णयावर फेरविचार कऱणार-अजित पवार