Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

LIVE: उद्धव ठाकरे परभणी आणि बीडला भेट देणार

Webdunia
शनिवार, 28 डिसेंबर 2024 (20:44 IST)
Maharashtra Marathi Breaking News Live Today: संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भेट घेण्याची घोषणा केली आहे.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.... 



10:21 PM, 28th Dec
प्राजक्ता माळी यांनी दिले सुरेश धस यांना सड़ेतोड़ उत्तर
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज पत्रकार परिषद् घेतली अणि त्यातून त्यांनी सुरेश धस यांना सड़ेतोड़ उत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात सरपंच सुरेश देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात सुरेश धस यांनी आकाचा उल्लेख केला मात्र हे आका कोण आहे याचा उल्लेख केला नाही. या प्रकरणी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट केल्याच दिसून आले. 

08:59 PM, 28th Dec
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करत धनंजय मुंडे यांना बडतर्फ करण्याची मागणी
महाराष्ट्रातील बीड शहरात मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी जमाव जमला. लाखोंच्या संख्येने जमले आणि मोर्चा काढला. यावेळी सत्ताधारी महायुतीच्या अनेक आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. सविस्तर वाचा.... 

08:44 PM, 28th Dec
उद्धव ठाकरे परभणी आणि बीडला भेट देणार,संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार
संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भेट घेण्याची घोषणा केली आहे. सविस्तर वाचा.... 

05:12 PM, 28th Dec
तिसरी मुलगी झाल्यानंतर पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले, परभणीतील घटना
 
आज मुला आणि मुलीत काही भेद नाही असे म्हणतात आज मुली देखील मुलांप्रमाणे सर्व कामे करत आहे. पण आज देखील काही भागात मुलीच्या जन्मावर शोक केला जातो. परभणीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला तिसरी मुलगी झाली म्हणून एका पतीने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिले. संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. सविस्तर वाचा....
 

04:42 PM, 28th Dec
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अजित पवारांची एंट्री, राष्ट्रवादी कडून 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
दिल्लीत 2025 च्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. फेब्रुवारीमध्ये येथे विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.सविस्तर वाचा....

04:22 PM, 28th Dec
नांदेड मध्ये गाडीचा हॉर्न वाजवल्याने तरुणाने गाडीच्या छतावर चढून मारहाण केली, गुन्हा दाखल
महाराष्ट्रातील नांदेड मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यात एका डॉक्टरने आपल्या वाहनाचा हॉर्न वाजवल्याने एका तरुणाला एवढा राग आला की त्याने डॉक्टरच्या वाहनावर चढून त्यांना मारहाण केली. या हल्ल्यात डॉक्टरने थेट पोलीस ठाणे गाठले. सविस्तर वाचा....

03:45 PM, 28th Dec
मुंबईत चालकाला मिरगीचा त्रास झाला,अनियंत्रित टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू तीन जखमी
मुंबईतील घाटकोपर परिसरात शुक्रवारीअनियंत्रित टेम्पो गर्दीतून धडक देत निघाला आणि या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.तर तिघे गंभीर जखमी झाले.पोलिसांनी महिलेच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे.सविस्तर वाचा....

03:43 PM, 28th Dec
जळगाव पोलिसांनी सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला,कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त
सध्या महाराष्ट्रात सायबर गुन्हांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. एकट्या जळगावातच 77 सायबर गुन्हांची नोंद आहे. पोलीस सायबर आरोपींना पकडण्यासाठी जळगाव पोलीस सातत्याने कारवाई करत आहे त्यात जळगाव पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.सविस्तर वाचा....

12:13 PM, 28th Dec
नागपुरात एटीएस सक्रिय, बांगलादेशी घुसखोरांचा शोध सुरू
बांगलादेशातील अस्थिरतेनंतर त्या देशातील नागरिक भारतात घुसखोरी करत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) सक्रिय झाले आहे. तसेच एटीएस नागपूरसह संपूर्ण राज्यात अशा घुसखोरांचा शोध घेत आहे. त्याअंतर्गत एटीएसने गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात शोधमोहीम राबवून संशयितांना अटक करण्यास सुरुवात केली आहे. सविस्तर वाचा 

12:12 PM, 28th Dec
नागपुरात एका गुन्हेगाराने मित्राची केली हत्या, पैशाच्या वादातून केला गुन्हा
नागपूरच्या अजनी येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पैशाच्या वादातून एका गुन्हेगाराने मित्राचा दगडाने ठेचून खून केला. हत्येनंतर आरोपीने   पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले. सविस्तर वाचा 
 

11:36 AM, 28th Dec
चंद्रपुरात दोन दुर्मिळ अस्वलांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू
राष्ट्रीय महामार्गावर दोन दुर्मिळ सिल्व्हर ब्लॅक अस्वलांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यामुळे दोघांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी आणि शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. यापूर्वीही मूल आणि विसापूर टोलनाक्याजवळ दुर्मिळ अस्वलांचा मृत्यू झाला होता. वन्यजीवप्रेमी उमेश ढेरे यांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सविस्तर वाचा 
 

11:03 AM, 28th Dec
मुंबईमधील कुर्ल्यातील एका गोदामाला भीषण आग
कुर्ला पश्चिम येथील बाजारपेठेतील भंगार आणि प्लॅस्टिक साहित्याच्या गोदामाला शनिवारी पहाटे लेव्हल 3 ला आग लागली. वाजिद अली कंपाऊंड, इंडिया मार्केट, खैरानी रोड, साकीनाका, कुर्ला (पश्चिम) येथे ही घटना घडली. सविस्तर वाचा 

11:02 AM, 28th Dec
गोंदियात एका दहशतवाद्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले
गोंदिया पोलिसांकडून राबविण्यात येत असलेली नक्षलविरोधी मोहीम आणि सरकारची आत्मसमर्पण योजना पाहता एका धाडसी नक्षलवाद्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. सविस्तर वाचा 
 

10:11 AM, 28th Dec
महाविकास आघाडीची आज महारॅली, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी विरोधक रस्त्यावर उतरणार
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना शिक्षा करण्याची मागणी विरोधी आघाडी महाविकास आघाडीकडून सातत्याने होत आहे. दरम्यान, एमव्हीएकडून आता मोठे पाऊल उचलले जात आहे. सविस्तर वाचा 

09:43 AM, 28th Dec
पालघरमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर तीन जणांना रेल्वेची धडक, दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील रेल्वे क्रॉसिंगवर शुक्रवारी रेल्वेची धडक बसून दोन जण ठार तर एक गंभीर जखमी झाला. सविस्तर वाचा 
 

09:42 AM, 28th Dec
एक होईल पवार कुटुंब?नव्या वर्षात या दिवशी होणार महत्त्वाची बैठक
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शरद पवार यांच्या पक्षाने 8 आणि 9 जानेवारीला मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. सविस्तर वाचा 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

प्राजक्ता माळी यांनी दिले सुरेश धस यांना सड़ेतोड़ उत्तर

जपान आणि फिलिपाइन्समध्ये भूकंपाचे जोरदार धक्के

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करत धनंजय मुंडे यांना बडतर्फ करण्याची मागणी

LIVE: उद्धव ठाकरे परभणी आणि बीडला भेट देणार

उद्धव ठाकरे परभणी आणि बीडला भेट देणार,संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार

पुढील लेख
Show comments