Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मालेगावी इन्कम टॅक्सचा छापा; महामार्गावरील कत्तल करणार्‍या कंपनीवर आयकरने छापा

Webdunia
बुधवार, 18 जानेवारी 2023 (21:46 IST)
नाशिक : मालेगाव शहरात इन्कम टॅक्सने छापेमारी केली आहे. शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील कत्तल करणार्‍या कंपनीवर आयकरने छापा टाकला आहे. या ठिकाणी गेल्या २४ तासांपासून कारवाई सुरू असून मालेगावातील अजूनही काही कत्तल कारखाने आयकरच्या रडारवर असल्याची माहिती आहे. आयकर विभागाकडून मालेगावसह सह राज्यभरात देखील ही कारवाई सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.
 
कंपनीचे गेट बंद करून हा ताफा आत जात राहतो. बीफ निर्यात करणाऱ्या अल फैज या कंपनीच्या मालेगाव येथील कार्यालयावर मुंबई आणि पुणे आयकर विभागाने हा छापा टाकला आहे. अल फैज ही कंपनी देशासह परदेशातही बीफ म्हणजेच जनावरांचं मांस निर्यात करते, अशी माहिती आहे.
 
दरम्यान यावेळी तीन वाहनांद्वारे मालेगाव येथील हे कार्यालय गाठत अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे. या पथकाने शहरातून एक चार्टर्ड अकाउंटला चौकशी दरम्यान ताब्यात घेतलं असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुंबई आग्रा महामार्ग लगत पवारवाडी शिवारात हा कारखाना असून या कारखान्यातून जनावरांचं मास म्हणजेच बीफ निर्यात केली जात असते. गेल्या अनेक वर्षांपासून हा कारखाना सुरू असून शासनाचा कर चुकवल्यामुळे छापे पडले असल्याचं म्हटलं जात आहे.
 
थोडक्यात बातमी
 
-मालेगाव शहरात इन्कम टॅक्सचे छापे
-शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील कत्तल करणार्‍या कंपनीवर आयकरने टाकला छापा
-गेल्या २४ तासांपासून कारवाई सुरू आहे
-मालेगावातील अजूनही काही कत्तल कारखाने आयकरच्या रडारवर
-कंपनीचे गेट बंद करून हा ताफा आत जात राहतो
-मालेगावसह सह राज्यभरात कारवाई सुरू असल्याची सूत्रांची माहिती
-अनेक कत्तल कारखाने आयकर विभागाच्या रडारवर असल्याची माहिती
आर्थिक उलाढालीच्या संशयावरून छापा टाकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अल फैज ही कंपनी देश परदेशात बीफ म्हणजेच प्राण्यांचे मास निर्यात करत असते. काल दुपारी बारा वाजेपासून अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी तपास सुरू होता. दरम्यान शहरातून देखील एका चार्टर्ड अकाउंटंट ला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या छापायच्या माध्यमातून काही हाती लागलेआली आहे का याची अद्याप माहिती मिळू शकली नाहीये.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

Siddhivinayak Temple New Dress Code मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात ३० जानेवारीपासून ड्रेस कोड लागू

सुळेंना हिंदुत्वाची अ‍ॅलर्जी, नितेश राणेंचा हल्ला, बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्या स्थलांतरितांना मोठा धोका म्हटले

पुण्यात १०० रुपयांत बलात्कार आणि हत्येची सुपारी दिली… ७वीच्या विद्यार्थ्याने केलेला धक्कादायक प्रकार

लाडकी बहीण योजनेवर ७ फेब्रुवारी रोजी सुनावणी, सरकारचे स्पष्टीकरण- याचिकाकर्त्यांना वेळ देण्यात आला

LIVE: मनोज जरांगे यांचे उपोषण संपणार

पुढील लेख
Show comments