Festival Posters

दुष्काळी लातूरला परतीच्या पावसाचा दिलासा मांजरा धरणात वर्षभर पुरेल इतके पाणी

Webdunia
परतीच्या पावसाच्या भरोश्यावर लातुरकर जगतात. मागच्या वर्षी हा परतीचा पाऊस कुठे गेला कळाले नाही. पण तो यंदा उशिरा का होत नाही परतला. मागच्या काही दिवसात या पावसाने कमाल दाखवली आणि मांजरा धरणात ११.५६ दशलक्ष घनमीटर इतका साठा झाला. अजूनही आवक सुरुच आहे. ही आवक ३० दशलक्ष घनमीटरपर्यंत पोचली तर पुढच्या वर्षभर पाणी पुरेल. पण त्यात चोरी व्हायला नको असं पाणी पुरवठा विभागात काम करणारे तज्ञ सांगतात. 
 
वांजरखेडा, कारसा पोहरेगाव, वांगदरी बंधारे आधीच भरली आहेत. आज नागझरी बंधार्‍याची दारे उघडण्यात आल्याने साई बंधाराही भरला आहे. नागझरी बंधार्‍यातून लातुरला पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मांजरा धरणावरील वीज पुरवठा दोन दिवसांपासून खंडीत आहे. आजही तो नीट झाला नाही. कालचे पाणी आज येईल असे सांगण्यात आले पण आजचे पाणी उद्याही येईल याबाबत खात्री देण्यास कुणीही तयार नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: मीरा-भयंदरमध्ये भाजप नगरसेवक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

T20 League: दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली, हैदराबादने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

टीम इंडियामध्ये या ५ नवीन खेळाडूंचा समावेश होणार!

गडचिरोलीच्या वन विभागाची कारवाई; दुर्मिळ वन्यजीवांची शिकार करणाऱ्या १२ जणांना अटक

भाजप नेत्या नाझिया खान यांनी लेन्सकार्ट स्टोअरला भेट दिली, हिंदू कर्मचाऱ्यांना टिळा लावला; व्हिडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments