Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Manmad : धावत्या दुचाकीवरच पोलिसाला हार्ट अटॅक

Webdunia
रविवार, 14 मे 2023 (14:56 IST)
Policeman Heart Attack  : काळ आला होता पण वेळ आली नव्हती हे आज प्रत्यक्षात घडले आहे. मनमाड येथे. मनमाड शहरात रेल्वे पोलीस कर्मचारी दुचाकीवरून जात असता शहरातील मुख्य बाजार पेठेत अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ते खाली कोसळले .नागेश दांडे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते ड्युटीवर जात होते. अचानक घटलेल्या या घटनेमुळे त्या भागात गर्दी झाली.गर्दी का झाली हे विचारात एक तरुण त्यांच्या कडे आला आणि त्याच्या लक्षात आले की दांडे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्याने तातडीने त्यांच्या हृदयावर पम्पिंग केले आणि तोंडाने दांडे यांना श्वास देऊन प्रथमोपचार केले. त्यामुळे दांडे यांना शुद्ध आली. 
 
भागवत झाल्टे असे या तरुणाचे नाव आहे. भागवत झाल्टे यांनी नागेश दांडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल  केले असून डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे सांगितले मात्र भागवत या तरुणाने प्रसंगावधान राखून केलेल्या प्रथमोपचारामुळे दांडे यांचे प्राण वाचले. दांडे यांच्या आयुष्याची दोरी बळकट असल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. असं  म्हणतात देव तयारी त्याला कोण मारी. देवाने आपल्या दूताच्या रूपात दांडे यांचे प्राण वाचविण्यासाठी भागवत झाल्टे यांना पाठविले.आणि भागवत याने प्रसंगावधान राखून उपचार करून नागेश यांचे प्राण वाचविले. 
 

Edited by - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

IND Vs AUS: पर्थ कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाचा पराभव

Ipl mega auction : व्यंकटेश अय्यर आयपीएल इतिहासातील तिसरा सर्वात महागडा भारतीय बनला

मुलीच्या भावाने केले प्रियकराचे निर्घृण खून

कांतारा चॅप्टर 1 च्या स्टार कास्टच्या बसचा अपघात,अनेक जण गंभीर जखमी

भारतीय तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई, अंदमानच्या समुद्रामधून 5 टन ड्रग्ज जप्त

पुढील लेख
Show comments