Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जालन्यात मनोज जरांगे पाटील लेझीम खेळण्यात दंग

manoj jarange patil
, शनिवार, 30 डिसेंबर 2023 (12:02 IST)
मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मनोज जरांगे हे लेझीम खेळताना दिसत आहे. या व्हिडीओ मध्ये जरांगे पाटील हे ढोल ताशाच्या तालावर लेझीम खेळात आहे. या पूर्वी त्यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ देखील समोर आला होता.

आज जरांगे यांचा ढोल-ताशा -हलगीच्या तालावर अचूक ठेका देत लेझीम खेळण्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी विचारात पडले आहे की हे राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी अल्टिमेटम देणारे जरांगे पाटीलच आहे का? जालन्यात ते लेझीम खेळताना दिसत आहे. 

जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी घेत उपोषण सुरु आहे. येत्या 20 जानेवारी पासून ते मुंबईत पुन्हा आंदोलन करणार आहे.  

Edited By- Priya DIxit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या युजर्सचे इन्स्टाग्राम, फेसबुक अकाउंट डिलीट होणार, केंद्र सरकारचा नवीन नियम